डोनाल्ड ट्रम्प नेहमीच लाल रंगाची टाय का वापरतात? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:16 IST2025-04-05T14:16:02+5:302025-04-05T14:16:48+5:30

Trump Red Tie : ट्रम्प हे नेहमीच लाल टाय का घालून असतात? याच प्रश्नाचं उत्तर आज जाणून घेणार आहोत. इतकंच नाही तर त्यांची ही कुठे तयार होते आणि किंमत लागते हेही जाणून घेऊ.

Why does Donald Trump always wear a red tie where are these made | डोनाल्ड ट्रम्प नेहमीच लाल रंगाची टाय का वापरतात? जाणून घ्या कारण...

डोनाल्ड ट्रम्प नेहमीच लाल रंगाची टाय का वापरतात? जाणून घ्या कारण...

Trump Red Tie : सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या देशांवर वाढवलेल्या टॅरीफची चर्चा सुरू आहे. सगळे देश वाढलेल्या टॅरीफमुळे टेंशनमध्ये आहेत. अशातच नेहमीप्रमाणे त्यांच्या सूटची चर्चा खूप होते. खासकरून त्यांच्या लाल टायची चर्चा अधिक होते. डोनाल्ड ट्रम्प  हे नेहमीच लाल टाय घालून असतात. अशात अनेकांना प्रश्न पडतो की, ट्रम्प हे नेहमीच लाल टाय का घालून असतात? याच प्रश्नाचं उत्तर आज जाणून घेणार आहोत. इतकंच नाही तर त्यांची ही कुठे तयार होते आणि किंमत लागते हेही जाणून घेऊ.

तसं पहायला गेलं तर अमेरिकेतील अनेक राष्ट्राध्यक्ष हे लाल टायचा वापर करत होते. पण ट्रम्प हे याबाबत सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहेत. ते नेहमीच इटालीयन लाल टायमध्ये दिसतात. त्याचं कारण आज जाणून घेऊ.

डोनाल्ड ट्रम्प हे लाल टाय वापरतात यामागचं मुख्य कारण म्हणजे राजकीय व्यक्तीत्व आणि इम्प्रेशन. मानसिक एक्सपर्टनुसार, लाल रंग शक्ती, प्रभुत्व आणि आत्मविश्वासाचं प्रतीक मानलं जातं. ट्रम्प आपला प्रभाव एका “अल्फा लीडर” च्या रूपात दाखवतात. लाल टाय त्यांच्य व्यक्तिवाला समोर आणतात.

लाल टाय, पांढरं शर्ट आणि निळा सूटचं हे कॉम्बिनेशन अमेरिकेचा राष्ट्र ध्वज दर्शवतो. यानं त्यांची देशभक्ती आणखी मजबूत होते. ते स्वत:ला राष्ट्रवादी असल्याच्या रूपात दर्शवतात. 

टाय कुठे तयार होते?

ट्रम्प यांची टाय सामान्यपणे इटली किंवा चीनमध्ये तयार होते. तसे त्यांचे जास्तीत जास्त कपडे परदेशात तयार होतात. म्हणजे त्यांची टाय चीनमध्ये तयार होते तर त्यांचे सूट इटली किंवा इतर देशांमध्ये तयार होतात. त्यांचे सूट चीन, बांगलादेश किंवा मेक्सिको, व्हिएतनाममध्ये तयार होतात.  इतकंच नाही तर त्यांची टाय, बेल्ट आणि कफलिंक्स मुख्यपणे चीनमध्ये तयार होतात. 

कोण करतं याचा खर्च?

ट्रम्प यांचे सूट सामान्यपणे इटलीच्या ब्रियोनी ब्रॅंडकडून बनवले जातात. त्यांचे शूज किंवा इतरही गोष्टी परदेशातून येतात. यासाठीचा खर्च व्हाईट हाऊसकडून केला जातो. 

Web Title: Why does Donald Trump always wear a red tie where are these made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.