पाण्याच्या बॉटलच्या झाकणांचा रंग वेगवेगळा का असतो? जाणून घ्या प्रत्येक रंगाचा अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 01:47 PM2023-11-13T13:47:24+5:302023-11-13T13:48:21+5:30
Water Bottle Cap Color Meaning : वेगवेगळ्या कंपन्यांच्या पाण्याच्या बॉटलच्या झाकणांचा रंग वेगळा असतो. चला जाणून घेऊ याचं कारण आणि त्याचा अर्थ...
Why Does Drinking Water Bottle Have a Colorful Cap: भारतात पाणी बॉटलमध्ये मिळण्याला 1970 मध्ये सुरूवात झाली होती. पण आज देशातील एक चतुर्थांश लोकसंख्या बॉटलमधील पाण्यावर अवलंबून आहे. भारतात बिसलेरी सगळ्यात विश्वासू आणि नंबर 1 मिनरल वॉटर कंपनी म्हणून ओळखली जाते.
देशात पाण्याच्या अनेक कंपन्या आहेत, पण जास्तीत जास्त लोकांसाठी ‘प्यूरीफाय वॉटर’चा अर्थ 'बिसलेरी' असाच आहे. गेल्या काही दशकांमध्ये बिसलेरीसहीत अनेक कंपन्यांनी त्यांच्या पाणी पॅकेजिंग आणि ब्रांडिंगमध्ये अनेक बदल केले आहेत. तुम्हीही अनेकदा पाण्याची बॉटल खरेदी केली असेल. पण याच्या झाकणाच्या रंगाकडे कधी लक्ष दिलं का?
जर तुम्ही कधी पाण्याची बॉटल बारकाईने बघितलं असेल तर यांच्या झाकणांचा रंग वेगवेगळा असतो. वेगवेगळ्या कंपन्यांच्या पाण्याच्या बॉटलच्या झाकणांचा रंग वेगळा असतो. चला जाणून घेऊ याचं कारण आणि त्याचा अर्थ...
मार्केटमध्ये पाण्याच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. जेवढे ब्रँड तेवढे त्यांचे प्रकारही आहेत. पण आता तुम्हाला विचार पडला असेल की, पाणी तर सगळं सारखंच असतं ना...मग यात प्रकाराचा काय संबंध? याचं उत्तर तुम्हाला बॉटलच्या झाकणातून मिळतं. कारण प्रत्येक रंगाच्या झाकणाचा आपला एक वेगळा अर्थ असतो. चला जाणून घेऊ काय असतो त्यांचा अर्थ...
1) पांढऱ्या रंगाचं झाकण - याचा अर्थ हा आहे की, बॉटलमधील पाणी Processed आहे.
2) काळ्या रंगाचं झाकण - याचा अर्थ असा होतो की, पाणी Alkaline आहे.
3) निळ्या रंगाचं झाकण - निळ्या रंगाचं झाकण असण्याचा अर्थ असा होतो की, पाणी धबधब्यातून घेतलं आहे.
4) हिरव्या रंगाचं झाकण - याचा अर्थ असा होतो की, पाण्यात फ्लेवर मिक्स केलं आहे.
जर तुम्हीही कधी पाण्याची बॉटल विकत घ्याल तर याच्या झाकणाचा रंग नक्की चेक करा.