दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात का असतात 28 किंवा 29 दिवस?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 03:46 PM2023-07-26T15:46:05+5:302023-07-26T15:46:29+5:30

दर चार वर्षांनी फेब्रुवारीमध्ये 28 ऐवजी 29 दिवस असतात. सोबतच एकूण इतर वर्षांच्या तुलनेत या वर्षात 365 नाही तर 366 दिवस असतात. 2020 आधी 2016 च्या फेब्रुवारीमध्ये लीप ईअर होतं.

Why does February have 28 days and sometimes 29 days know the reason | दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात का असतात 28 किंवा 29 दिवस?

दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात का असतात 28 किंवा 29 दिवस?

googlenewsNext

लीप ईअरमध्ये इतर वर्षांच्या तुलनेत एक दिवस जास्त असतो. पण हे असं का आणि कसं होतं हे तुम्हाला माहीत आहे का? आपल्या कॅलेंडरमध्ये दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जास्त का जोडला जातो? पण याचं कारण काय हे जाणून घेऊ.

दर चार वर्षांनी फेब्रुवारीमध्ये 28 ऐवजी 29 दिवस असतात. सोबतच एकूण इतर वर्षांच्या तुलनेत या वर्षात 365 नाही तर 366 दिवस असतात. 2020 आधी 2016 च्या फेब्रुवारीमध्ये लीप ईअर होतं आणि नंतर आता 2024 मध्ये असेल. एक कॅलेंडर हे पृथ्वीच्या वातावरणानुसार असतं. तर एका कॅलेंडरमध्ये दिवसांची संख्या पृथ्वीद्वारे सूर्याची परिक्रमा करण्यासाठी लागणाऱ्या वेळेनुसार असते.

पृथ्वीला सूर्याच्या चारही बाजूने एक चक्कर पूर्ण करण्यासाठी जवळपास 365.242 दिवसांचा वेळ लागतो. पण दरवर्षी सामान्यपणे 365 दिवस असतात. आता पृथ्वीने सूर्याला मारलेली अतिरिक्त 0.242 दिवसांची फेरी चार वेळा एकत्र केली गेली तर हा वेळएक दिवसाच्या बरोबरीत होतो.

त्यामुळे चार वर्षातून एकदा एक दिवस वाढतो आणि दर चार वर्षांनी एक दिवस अधिकचा जोडला जातो. यावर्षीही असंच लीप ईअर आहे.
तसं बघायला गेलं तर हे चुकीचं वाटू शकतं. पण ही चूक ग्रेगोरिअन कॅलेंडरच्या माध्यमातून सुधारण्यात आली. हे तेच कॅलेंडर आहे जे आज आपण आपल्या घरातील भिंतींवर लावतो किंवा मोबाइलमध्ये वापरतो. 1582 मध्ये ग्रेगोरिअन कॅलेंडर सादर करण्यात आलं होतं. 

ग्रोगेरिअनआधीही ज्यूलिअन कॅलेंडर होतं, ज्यावरून दिवस ठरत होते. हे कॅलेंडर इसपू 45 मध्ये तयार केलं होतं. पण लीप ईअरसाठी एक वेगळं कॅलेंडर असायचं. ज्यूलियन कॅलेंडरमध्ये पृथ्वीच्या परिक्रमेचा निश्चित वेळ माहीत नसल्याने यात काही त्रुटी होत्या.

16व्या शतकात ज्यूलिअन कॅलेंडरमधील त्रुटी दूर बरोबर करण्यासाठी 1582 मध्ये पोप ग्रेगरी XIII ने हा आदेश दिला होता की, त्यावर्षी 4 ऑक्टोबरनंतर थेट 15 ऑक्टोबर तारीख येईल. अशाप्रकारे चूक सुधारण्यात आली. ही नवीन प्रणाली ग्रेगोरिअन कॅलेंडरच्या रूपात ओळखली जाऊ लागली.

आता लीप ईअर कसं ओळखायचं यासाठी काही नियम असतात. त्यातील एक म्हणजे ते वर्ष चारने भागायचं. जसे की, 2000 ला4 ने भागलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे 2004, 2008, 2012, 2016 आणि आता हे 2020 याच क्रमात आहेत.

Web Title: Why does February have 28 days and sometimes 29 days know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.