लग्नात नवरदेव घोडीवरच का बसतात, घोड्यावर का नाही? जाणून घ्या अजब कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 01:40 PM2022-12-15T13:40:12+5:302022-12-15T14:49:35+5:30

Interesting Facts : याचं कारण काय आहे? खरंतर सगळ्यांना घोडीवर बसून स्टाईल मारायची घाई असते कारण कशाला कुणी शोधत बसणार ना...पण आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत.

Why does groom sits mare and not horse his marriage, know the reason | लग्नात नवरदेव घोडीवरच का बसतात, घोड्यावर का नाही? जाणून घ्या अजब कारण...

लग्नात नवरदेव घोडीवरच का बसतात, घोड्यावर का नाही? जाणून घ्या अजब कारण...

googlenewsNext

Interesting Facts : लग्न म्हटलं की, आजकाल सगळेच नवरदेव घोडीवर बसून येतात. म्हणजे आता तर असं झालंय की, घोडीवर बसून येणं फॅशन झाली आहे. वरातीला घोडी असल्याशिवाय नवरदेव बाहेरच येत नाही. पण कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की, लग्नात नवरदेव घोडीवर बसूनच का येतात? किंवा याचं कारण काय आहे? खरंतर सगळ्यांना घोडीवर बसून स्टाईल मारायची घाई असते कारण कशाला कुणी शोधत बसणार ना...पण आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत.

Quora नुसार, घोड्यांना हिंदू संस्कृतीमध्ये फार महत्व आहे. मग तो अश्वमेध यज्ञ असो वा कृष्णाकडून अर्जूनाचा रथ चालवणं असो घोड्यांचं महत्व वेळोवेळी बघायला मिळतं. तसेच राजा म्हटले की घोडा असणारच हे समीकरणच होतं. पण घोडा चालवण्याचा थेट अर्थ असा आहे की, घोडा चालवणाऱ्या व्यक्तीने आता बालपणाचा त्याग केलाय आणि ती व्यक्ती भरपूर जबाबदाऱ्या असलेल्या जीवनाच्या नव्या अध्यायाला सुरूवात करणार असते.

याचं आणखी दुसरं कारण असं सांगितलं जातं की, प्राचीन काळात जेव्हा लग्ने होत होती तेव्हा नवरीसाठी किंवा आपल्या शौर्याचं प्रदर्शन करण्यासाठी लढाई केली जात होती. शास्त्रात असे अनेक प्रसंग वाचायला मिळतात जेव्हा नवरदेवाला नवरीसाठी लढाई करावी लागली.
एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, नवरदेव घोड्याऐवजी घोडीवर बसतात कारण घोडी जास्त चंचल असते आणि त्यांना वशमध्ये करणं म्हणजेच कंट्रोल करणं कठिण असतं. काही इतर मान्यतांनुसार, घोडी बुद्धीमान, दक्ष आणि चलाख प्राणी आहे. घोडीला कंट्रोल करणं या गोष्टीचं प्रतीक मानलं जातं की, नवरदेव आता परिवाराची धुरा सांभाळू शकतो.

Yahoo च्या एका रिपोर्टनुसार, जास्तीत जास्त पंजाबी लग्नांमध्ये घोडीला सजवलं जातं आणि तिच्या शेपटीवर मोली बांधली जाते. तर नवरदेवाची बहीण घोडीला चणे खाऊ घालते. पूर्वी उत्तर भारतातील किंवा पंजाबातील लग्नांमध्येच घोडीचा वापर केला जात होता. पण आता तर देशातील सगळ्याच लग्नात नवरदेव घोडीवर बसून वरात काढतो.

Web Title: Why does groom sits mare and not horse his marriage, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.