श्वान रात्री जोरजोरात का रडायला लागतात? कारणं अशी ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 09:29 AM2023-04-28T09:29:26+5:302023-04-28T09:29:46+5:30

Why Dogs Cry At Night : अनेक लोक असंही म्हणतात की, रात्री श्वानांना जेव्हा भूत-आत्मा दिसतात त्यामुळे ते घाबरतात आणि रडू लागतात. पण खरंच यात काही तथ्य आहे का? चला जाणून घेऊ याबाबत...

Why dogs cry at night know the reasons | श्वान रात्री जोरजोरात का रडायला लागतात? कारणं अशी ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल!

श्वान रात्री जोरजोरात का रडायला लागतात? कारणं अशी ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल!

googlenewsNext

Why Dogs Cry At Night : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, श्वान रात्री जोरजोरात रडतात. त्यांच्या रडण्याच्या आवाजाने लोकांची झोपमोड होते आणि श्वानांच्या या रडण्याला अपशकून मानला जातो. अनेक लोक असंही म्हणतात की, रात्री श्वानांना जेव्हा भूत-आत्मा दिसतात त्यामुळे ते घाबरतात आणि रडू लागतात. पण खरंच यात काही तथ्य आहे का? चला जाणून घेऊ याबाबत...

काय असतं यामागचं कारण?

वैज्ञानिकांनुसार, रात्री श्वानांच्या रडण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. यातील एक मुख्य कारण म्हणजे त्यांचं वय वाढणं. वाढत्या वयासोबत जेव्हा श्वान शारीरिक रूपाने कमजोर होऊ लागतात तेव्हा त्यांना आधीच्या तुलनेत जास्त एकटेपणा जाणवतो आणि त्यांना उदास वाटतं. यामुळे ते रात्री रडून आपलं दु:खं आणि निराशा व्यक्त करतात. अनेक ते त्यांच्या मृत साथीदारांना आठवूनही रडतात.

दुसरं कारण

एक्सपर्ट सांगतात की, जेव्हा दुसऱ्या एरियातील एखादा श्वान त्यांच्या एरियात येतो तेव्हा तेथील श्वान रडणं सुरू करतात. असं करून ते आपल्या एरियातील श्वानांना सूचना देतात की, दुसऱ्या एरियातील श्वान आपल्या एरियात आला आहे. त्यासोबत तब्येत बिघडल्यावर किंवा जखमी झाल्यावरही श्वान रडतात.

रस्ता चुकल्यावर

अनेक रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, श्वान रस्ता भरकटले किंवा आपल्या परिवारापासून वेगळे झाले तेव्हा रात्री निराश होऊन ते जोरजोरात रडू लागतात. ही तशीच भावना आहे जशी मनुष्याचा एखादं मुल आपल्या परिवारापासून दूर गेल्यावर जोरजोरात रडू लागतं.
 

Web Title: Why dogs cry at night know the reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.