श्वान जीभ बाहेर काढून श्वास घेत का बसतात? तुम्हालाही माहीत नसेल याचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 03:05 PM2023-04-24T15:05:01+5:302023-04-24T15:06:21+5:30
Why Dogs Hang Their Tongues Out When They Pant : थकल्यानंतर ते जीभ बाहेर काढून श्वास घेत बसतात. पण कधी विचार केलाय का की, श्वान जीभ बाहेर काढून का श्वास घेत बसतात? चला जाणून घेऊ याचं उत्तर...
Why Dogs Hang Their Tongues Out When They Pant : पाळीव प्राण्यांमध्ये लोक सगळ्यात जास्त श्वान पाळतात. श्वानांना शिकवणं सोपं मानलं जातं आणि एकदा जर ते तुम्ही शिकवल्याप्रमाणे शिकले तर त्यांच्यासारखा इमानदार प्राणी दुसरा नसतो. श्वानांसोबत एकदा लळा लागला की, तो कमी होत नाही. ते सुद्धा आपल्यावर प्रेम करतात. जेव्हा त्यांनी कुणाला ओळखलं किंवा त्यांना लाड करून घ्यायचे असतात तेव्हा ते शेपूट हलवतात आणि भूंकतात. थकल्यानंतर ते जीभ बाहेर काढून श्वास घेत बसतात. पण कधी विचार केलाय का की, श्वान जीभ बाहेर काढून का श्वास घेत बसतात? चला जाणून घेऊ याचं उत्तर...
श्वानांचं शरीर हे इतर प्राण्यापेक्षा वेगळं असतं. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या क्रिया सुद्धा वेगळ्या असतात. म्हणजे आपण मनुष्यांना जेव्हा गरमी होते. तेव्हा आपला घाम निघतो. हा घाम आपल्या घामाच्या ग्रंथी म्हणजे स्वेट ग्लॅंडमधून निघतो. तेच श्वानांमध्ये घामाची कोणतीही ग्रंथी नसते. त्यांच्या पंजा आणि जिभेला घाम येतो. त्यामुळे जास्त धावल्यावर किंवा जास्त उष्णता जाणवल्यावर श्वान जीभ काढून श्वास घेत बसतात. याने त्यांच्या शारीरिक सिस्टीमला पुरेसं ऑक्सिजन मिळतं. सोबतच जीभ बाहेर काढून श्वान गरमीलाही कंट्रोल करतात.
(Image Credit : dogtime.com)
जर तुमच्या घरात डॉगी असेल तर तुम्ही पाहिलं असेल की, त्यांना गरमी होते तेव्हा ते जीभ काढून श्वास घेत बसतात. अशात त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांची काळजी घ्या. त्यांच्या आजूबाजूला थंड वातावरण ठेवा, सोबतच त्यांनी पाणी द्या. जेणेकरून त्यांना थंड वाटेल.
जर पाणी दिल्यानंतरही किंवा थंड वातावरणामुळेही त्यांना आराम मिळत नसेल तर वेळीच त्यांना डॉक्टरांना दाखवा. कारण आपल्यासारखीच श्वानांना देखील उष्णतेमुळे समस्या होते.
श्वांनाना उष्णतेची सगळ्यात जास्त समस्या यामुळे होते कारण त्यांना इतर प्राण्यापेक्षा जास्त गरमी होते. यात सगळ्यात जास्त गरमी यूरोपीय प्रजातीच्या श्वानांना लागते.