गाड्यांमधील एक्स्ट्रा टायरला स्टेपनी का म्हटलं जातं? तुम्हालाही माहीत नसेल कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 09:51 AM2023-05-25T09:51:57+5:302023-05-25T09:52:40+5:30
Extra Tyre's In Vehicles: तुम्हीही हा शब्द अनेकदा उच्चारला असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की, या एक्स्ट्रा टायरला स्टेफनी का म्हटलं जातं? चला जाणून घेऊ यामागची इंटरेस्टींग कहाणी.
Extra Tyres In Vehicles: गाडी जर पंचर झाली तर लगेच गॅरेज शोधण्याची गरज पडत नाही. कारण कारमध्ये एक एक्स्ट्रा टायर ठेवलेला असतो आणि तो सहजपणे बदलताही येतो. कारमध्ये हा एक्स्ट्रा टायर असतो जेणेकरून वेळेवर गॅरेज शोधण्याची वेळ येऊ नये आणि लगेच प्रवास सुरळीत करता यावा. सोबतच वेळही वाचतो. या एक्स्ट्रा टायरला स्टेफनी म्हटलं जातं. तुम्हीही हा शब्द अनेकदा उच्चारला असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की, या एक्स्ट्रा टायरला स्टेफनी का म्हटलं जातं? चला जाणून घेऊ यामागची इंटरेस्टींग कहाणी.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साधारण 100 वर्षाआधी गाड्यांचं इतकं चलन नव्हतं. ब्रिटनच्या रस्त्यांवर जेव्हा गाड्या खराब होत होत्या तेव्हा लोकांना खूप समस्या होत होती. त्यांना पंचर काढण्यासाठी गॅरेज शोधावं लागत होतं किंवा टायर बदलावे लागत होते. हीच समस्या पाहून इंग्लंडमधील दोन भावांनी एक गॅरेज सुरू केलं.
असं सांगण्यात येतं की, दोन्ही भावांनी दुकानाचं नाव स्टेफनी टायर सर्विस असं ठेवलं. मुळात हे दुकानाचं नाव दोन्ही भावांनी त्यांच्या जिल्ह्याच्या नावावरून ठेवलं होतं. या दोन भावांची नावे वॉल्टर आणि टॉम डेविस होतं. त्यांचा बिझनेस हळूहळू वाढला. दुकान स्टेफनी नावाने फेमस झालं. नंतर हळूहळू एक्स्ट्रा टायरचं नाव स्टेफनी पडलं.
आज 100 वर्षानंतर याच एक्स्ट्रा टायरला स्टेफनी असं म्हणतात. तसं पाहिलं तर तो एक्स्ट्रा असतो जेणेकरून वेळेवर समस्या होऊ नये. आता तर अशा अनेक गाड्या आहेत ज्यात एक नाहीतर अनेक एक्स्ट्रा टायर असतात. यात मोठे ट्रक आणि मालवाहक गाड्यांचा समावेश आहे.