लग्नाच्या पहिल्या रात्रीला 'सुहागरात' का म्हटलं जातं? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 09:57 AM2023-07-11T09:57:39+5:302023-07-11T09:58:34+5:30

Suhagrat Interesting Facts : मुळात या रात्रीलाही दोन साथीदारांनामधील सहकार्य, प्रेम आणि विश्वासाच्या सुरूवातीचं प्रतीक मानलं जातं. ही रात्र दोघांच्या जीवनाच्या नव्या पर्वाची सुरूवात असते. ही रात्र दोघांच्या भविष्यातील आपसातील संबंधांना मजबूत करण्यात मदत करते. 

Why first night of married couple called sugahraat know the reason | लग्नाच्या पहिल्या रात्रीला 'सुहागरात' का म्हटलं जातं? जाणून घ्या कारण...

लग्नाच्या पहिल्या रात्रीला 'सुहागरात' का म्हटलं जातं? जाणून घ्या कारण...

googlenewsNext

First Night Of Married Couple: लग्नाला धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक रूपाने फार महत्व आहे. तेच काही समाजांमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीलाही फार महत्व असतं. या रात्रीची खास तयारी केली जाते. ही रात्र रितीरिवाज आणि परंपरांसोबत पार पाडली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, भारतात या रात्रीला सुहागरात किंवा मधुचंद्राची रात्र असं म्हणतात. चला जाणून घेऊ या रात्रीला सुहागरात का म्हटलं जातं? 

मुळात या रात्रीलाही दोन साथीदारांनामधील सहकार्य, प्रेम आणि विश्वासाच्या सुरूवातीचं प्रतीक मानलं जातं. ही रात्र दोघांच्या जीवनाच्या नव्या पर्वाची सुरूवात असते. ही रात्र दोघांच्या भविष्यातील आपसातील संबंधांना मजबूत करण्यात मदत करते. 

या रात्रीला सुहागरात म्हटलं जातं कारण यावेळी नवविवाहित पती-पत्नी द्वारे जेवणं, मनोरंजन आणि आराम त्यांच्या सुहागाचं प्रतीक असतं. हिंदीतील 'सुहाग' शब्द संस्कृतमधील शब्द 'सुहागिनी' मधून आला आहे. ज्याचा अर्थ 'सौभाग्यशाली विवाहित महिला' असा होतो. यासाठी या रात्रीला सुहागरात म्हटलं जातं आणि ही पूर्णपणे सुहागाला म्हणजे कुंकवाला समर्पित असते. सौभाग्याशाली विवाहित महिलेची पहिली रात्र तिच्या वैवाहिक जीवनाची प्रस्तावना मानली जाते.

सुहागरातीला नवविवाहित पती-पत्नी यांच्यातील रोमॅंटिक आणि एकमेकातील संबंध महत्वाचे असतात. ज्यात ते त्यांच्या संबंधाला समजतात आणि त्यांच्या मनातील गोष्टी बोलण्याची संधी मिळते. एका मीडिया रिपोर्टनुसार, सुहाग संस्कृत शब्द सौभाग्यापासून बनला आहे. सुहाग आणि सुहागन शब्द लग्नाशी संबंधित आहे. पतीचं सौभाग्य वाढवण्यासाठी सुहागाच्या गोष्टी सुहागनला घातल्या जातात. त्यामुळे सुहागाच्या पहिल्या रात्रीमुळे या रात्रीचं नाव सुहागरात असं पडलं.

Web Title: Why first night of married couple called sugahraat know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.