गॅस सिलेंडरच्या खाली का असतात छिद्र? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 11:01 AM2023-01-06T11:01:50+5:302023-01-06T11:02:51+5:30

LPF Facts: सिलेंडरच्या खाली छिद्र का असतात? तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण हे छिद्र तुमच्या सुरेक्षेसाठी दिलेले असतात. तुम्ही म्हणाल कसं?

Why gas cylinders hole at bottom interesting facts lpg cylinder | गॅस सिलेंडरच्या खाली का असतात छिद्र? जाणून घ्या यामागचं कारण...

गॅस सिलेंडरच्या खाली का असतात छिद्र? जाणून घ्या यामागचं कारण...

googlenewsNext

LPF Facts: तुमच्या घरातील गॅस सिलेंडर तुम्ही कधी बारकाईने पाहिलं का? तुम्हाला कधी प्रश्न पडला का की, सिलेंडरच्या खाली छिद्र का असतात? तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण हे छिद्र तुमच्या सुरेक्षेसाठी दिलेले असतात. तुम्ही म्हणाल कसं? चला तर जाणून घेऊ सिलेंडरला हे छिद्र का असतात?

उन्हाळ्यात सिलेंडर खूप गरम होतात. अशात तुम्ही कुठेना कुठे पाहिलं असेल की, स्वयंपाक करणारे लोक सिलेंडर थंड पाण्यात ठेवतात. ज्यामुळे सिलेंडरचं तापमान कमी होतं. हे छिद्रही तेच काम करतात. गॅस सिलेंडरचं तापमान वाढलं की, या छिद्रामधून हवा येत-जात राहते. जेणेकरून तापमान नियंत्रित रहावं. अशात यामुळे मोठी दुर्घटना टाळली जाते.

रंग आणि आकार एकसारखा का?

तुम्ही कधीना कधी लक्ष दिसेल की, सिलेंडर कोणत्याही कंपनीचं असो, त्यांमध्ये काहीना काही साम्य असतं. तुम्ही पाहिलं असेल की, घरगुती सिलेंडरचा रंग नेहमीच लालच असतो. त्याशिवाय त्यांचा आकारही सारखाच असतो. गॅस सिलेंडरचा रंग लाल असतो कारण तो दूरूनच सहजपणे दिसावा. याने गॅस सिलेंडरचं ट्रांसपोर्टेशन सोपं होतं. तुम्ही हायवेवर पाहिलं असेल की, तेल किंवा गॅस टॅंकरची शेपही सिलेंड्रिकल असतो. याचं कारण सिलेंड्रिकल शेपमध्ये गॅस आणि तेल जास्त ठेवता येतं आणि गॅस स्टोर करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे.

तुम्ही शाळेत विज्ञानात शिकले असाल की, LPG चा गंध येत नाही. अशात हा गॅस लिकेज झाला तरी समजणार नाही. यामुळे मोठी दुर्घटनाही होऊ शकते. यामुळेच जेव्हा सिलेंडरमध्ये गॅस भरला जातो तेव्हा यात Ethyl Mercaptan नावाचा आणखी एक गॅस भरला जातो. जेणेकरून गॅस लिकेज झाला तर आपल्याला लगेच गंध यावा आणि कळावं. याने मोठी दुर्घटना टाळता येऊ शकते.
 

Web Title: Why gas cylinders hole at bottom interesting facts lpg cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.