Namaste : भारतात लोक हात जोडून नमस्कार का करतात? याचा अर्थ जो तुम्हालाही माहीत नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 01:09 PM2023-02-14T13:09:35+5:302023-02-14T13:10:26+5:30

What is meaning of Namaste : कल्चर ट्रिप वेबसाइट रिपोर्टनुसार, हिंदू धर्मात नमस्तेला नमस्कार किंवा नमस्कारमही म्हणतात. लोकांना मान-सन्मान देण्यासाठी या शब्दाचा वापर केला जातो.

Why Indian's do Namaste? What is meaning of Namaste | Namaste : भारतात लोक हात जोडून नमस्कार का करतात? याचा अर्थ जो तुम्हालाही माहीत नसेल!

Namaste : भारतात लोक हात जोडून नमस्कार का करतात? याचा अर्थ जो तुम्हालाही माहीत नसेल!

googlenewsNext

What is meaning of Namaste : भारतातील कोणत्याही कोपऱ्यात जा तुमच्या स्वागत आणि सन्मानासाठी एक शब्द नक्कीच ऐकायला मिळतो. तो म्हणजे, नमस्कार किंवा नमस्ते! केवळ भारतच नाही तर भारताचे शेजारी देश नेपाळ, बांग्लादेश आणि साऊथ एशियामधील काही देशांमध्येही या शब्दाचा आणि क्रियेचा वापर केला जातो. पण या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसेल तर तेच आज आम्ही सांगणार आहोत.

कल्चर ट्रिप वेबसाइट रिपोर्टनुसार, हिंदू धर्मात नमस्तेला नमस्कार किंवा नमस्कारमही म्हणतात. लोकांना मान-सन्मान देण्यासाठी या शब्दाचा वापर केला जातो. नमस्ते शब्द हिंदू धर्माच्या 16 उपचारांपैकी एक आहे. ज्याचा वापर पूजा-पाठ करतानाही केला जातो. मंदिरात पूजा-पाठ करताना देवाला नमस्कार केला जातो. केवळ पूजेतही नाही तर अनेक भारतीय नृत्यांमध्येही नमस्काराचा वापर केला जातो. अनेक योगा करतानाही नमस्कार केला जातो. जर तुम्ही भारतात आहात आणि कुणाची संवाद साधायचा असेल तर नमस्कार करू शकता.

नमस्ते किंवा नमस्काराचा अर्थ काय असतो?

संस्कृत भाषेत बनलेल्या या शब्दाचा अर्थही फार खास आहे. हा नमः + ते शब्दापासून तयार झाला आहे. नमसचा अर्थ होता सन्मानाने झुकने आणि ते चा अर्थ आहे एखाद्यासमोर. याचा पूर्ण अर्थ झाला की, सन्मानाने एखाद्यासमोर नतमस्तक होणे. नमस्कार किंवा नमस्ते म्हणताना डोकं थोडं झुकवावं लागतं. हात आपसात जोडून बोटं आकाशाकडे करावी लागतात आणि अंगठे छातीला चिकटवावे लागतात. आता तुम्हाला याचा अर्थ माहीत पडला असेल तर हेही जाणून घ्या की, नमस्तेचा अर्थ का आहे आणि शेकहॅंडपेक्षा हे का चांगलं आहे.

हिंदूंमध्ये मान्यता आहे की, प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे. त्यामुळे एकमेकांना नमस्कार किंवा नमस्ते करून ते त्या आत्म्याता सन्मान करतात जी पर्मात्म्यासारखी आहे. इतकंच नाही तर हिंदूंमध्ये असंही मानलं जातं की, जेव्हाही आपण कुणाला भेटतो तेव्हा आपण त्याच्या शरीरालाच नाही तर आत्म्यालाही नमस्कार करतो. 

यामुळे नमस्कार म्हणून आपण हे दर्शवतो की, आपला मेंदू आणि मनही तुमच्याशी जुळला आहे. याद्वारे आपण प्रेम, मैत्री आणि सन्मानही देतो. जेव्हा कोविडची सुरूवात झाली होती तेव्हा जगाला नमस्कारचं महत्व समजलं होतं. तेव्हा जगात लोक नमस्कार करू लागले होते. इतर देशांचे राष्ट्राध्यक्षही नमस्ते करू लागले होते. याने एकमेकांना स्पर्श होत नव्हता आणि सन्मानही दिला जात होता. 

Web Title: Why Indian's do Namaste? What is meaning of Namaste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.