मोबाईलचा चार्जर नेहमी काळा किंवा पांढऱ्या रंगाचाच का असतो? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 11:50 AM2024-09-26T11:50:20+5:302024-09-26T12:07:07+5:30

Mobile Charger Colour : चार्जर नेहमीच पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचे असतात. पण हे केवळ पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचेच का असतात? याचा कधी तुम्ही विचार केला नसेल.

Why is mobile charger always black or white? know the reason | मोबाईलचा चार्जर नेहमी काळा किंवा पांढऱ्या रंगाचाच का असतो? जाणून घ्या कारण...

मोबाईलचा चार्जर नेहमी काळा किंवा पांढऱ्या रंगाचाच का असतो? जाणून घ्या कारण...

Mobile Charger Colour : मोबाईल चार्ज करण्यासाठी सगळ्यांनाच चार्जरची गरज पडते. तुम्हीही एखादं चार्जर वापरत असाल. पण तुम्ही कधी मोबाईलच्या चार्जरकडे कधी लक्ष दिलं का? चार्जर नेहमीच पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचे असतात. पण हे केवळ पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचेच का असतात? याचा कधी तुम्ही विचार केला नसेल. तुम्हालाही माहीत नसेल, पण यामागे काही खास कारण असतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काळ्या रंगाचे का असतात चार्जर?

पहिलं कारण म्हणजे काळा रंग उष्णतेला अधिक प्रभावीपणे अवशोषित करतो. काळ्या रंगाला एक इमिटर मानलं जातं आणि याची इमिशन व्हॅल्यू १ असते. याचा अर्थ असा होतो की, काळा रंग उष्णतेला आपल्यात अधिक चांगल्याप्रकारे अवशोषित करू शकतो. जे इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी महत्वाचं असतं. याने चार्जरची कार्यक्षमता चांगली राहते. कारण हे चार्जर अधिक तापमानावरही चांगलं काम करतं.

याचं दुसरं कारण आर्थिक आहे. काळ्या रंगाच्या मटेरिअलचं उत्पादन इतर रंगांच्या तुलनेत सामान्यपणे स्वस्त असतं. काळ्या रंगांची पेंटिंग किंवा कोटिंगचा खर्च इतर रंगांच्या तुलनेत कमी असतो. काळ्या रंगाची निवड करणं कंपन्यांसाठी कमी खर्चीक असतं. 

पांढऱ्या रंगांचे का असतात चार्जर?

आधी जास्तीत जास्त चार्जर हे काळ्या रंगांचेच असायचे, आता पांढऱ्या रंगाचे चार्जरही कॉमन झाले आहेत. पांढऱ्या रंगाची खासियत ही आहे की, यात लो रिफ्लेक्ट कॅपेसिटी असते. याचा अर्थ असा होतो की, पांढरा रंग बाहेरच्या उष्णतेला अवशोषित करत नाही, तर ती उष्णता बाहेरच ठेवतो. अशाप्रकारे पांढरे चार्जर बाहेरच्या उष्णतेला आत येऊ देत नाहीत. ज्यामुळे चार्जरचं तापमान नियंत्रित राहतं. पांढरा रंग इलेक्ट्रॉनिक वस्तुंचं तापमान स्थिर ठेवण्यास मदत करतं.  

Web Title: Why is mobile charger always black or white? know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.