Popcorn in Cinema Hall: थिएटरमध्ये पॉपकॉर्न इतके महाग का विकले जातात? जाणून घ्या त्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 12:35 PM2023-03-27T12:35:09+5:302023-03-27T12:37:59+5:30
Popcorn prices in Cinema Hall: थिएटरमधील पॉपकॉर्न आणि इतर खाद्यपदार्थ्यांच्या किमती हा आजचा वादाचा विषय नसून बराच आधीपासूनचा आहे. ...
Popcorn prices in Cinema Hall: थिएटरमधील पॉपकॉर्न आणि इतर खाद्यपदार्थ्यांच्या किमती हा आजचा वादाचा विषय नसून बराच आधीपासूनचा आहे. यावरून अनेक वेळा काही संघटनांनी आंदोलनं देखील केली आहेत. खाद्यपदार्थ्यांच्या किमती कमी असायला हव्यात. तसेच प्रेक्षकांना आपल्या घरचे डबे किंवा इतर खाद्यपदार्थ सिनेमा हॉलमध्ये घेऊन जाऊ द्यावेत यावरही अनेक वेळा चर्चा झाली. जानेवारी महिन्यात बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफने सिनेमागृहात असलेल्या पॉपकॉर्नच्या किमतीवर भाष्य केलं होतं. जग्गू दादा म्हणाले होते, 'थिएटरमध्ये पॉपकॉर्नची किंमत कमी करा. पॉपकॉर्नचे ५०० रुपये घेतात.' आज जागतिक रंगभूमी दिन (World Theatre Day 2023) च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतो की सिनेमागृहांमध्ये पॉपकॉर्नची किंमत जास्त का असते?
सिनेमा हॉलमध्ये मिळणाऱ्या पॉपकॉर्नची किंमत कधीकधी चित्रपटाच्या तिकिटापेक्षा दुप्पट असते. अशा स्थितीत हा प्रश्न नेहमी मनात राहतो की ते इतके महाग का आणि त्यावर काही कायदेशीर बंधने आहेत की नाहीत? जानेवारी महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने सिनेमागृहांच्या मालकांना त्यांच्या इच्छेनुसार हॉलमध्ये अटी व शर्ती ठेवण्यास मोकळे असल्याचे सांगितले होते. यासोबतच चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास बंदी घालण्यास हॉल मालक मोकळे आहेत, असेही न्यायालयाने म्हटले. म्हणजे थिएटर मालकांना त्यांच्या आवडीनुसार हॉलच्या आत खाण्या-पिण्याची किंमत ठरवता येतील असे सांगण्यात आले. आता बाहेर मिळणाऱ्या पॉपकॉर्नपेक्षा सिनेमा हॉलमधले भाव 10 पटीने कसे वाढतात? याची अनेक कारणे आहेत.
'फुलराणी' चित्रपटातील 'या' अभिनेत्रीचे Hot Photos पाहिलेत का?
ही असतात कारणं...
पहिले कारण, थिएटरमध्ये पॉपकॉर्न विक्रेत्यांना त्यांचा दुसरा कोणीही स्पर्धक नसतो. अशा स्थितीत एकदा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाच्या आवारात प्रवेश केला की, प्रेक्षकाला थिएटर स्टॉलशिवाय जेवणासाठी दुसरा पर्याय नसतो. अशा स्थितीत त्याला खायचेच असेल तर तो कितीही खर्च करून तिथलेच पॉपकॉर्न किंवा खाद्यपदार्थ खातो.
दुसरे कारण म्हणजे, अनेकवेळा चित्रपटगृह मालकांना चित्रपटाची तिकिटे तोट्यात विकावी लागतात. त्यांना बॉक्स ऑफिसमधून मिळणाऱ्या नफ्यातील मोठा हिस्सा वितरकांना द्यावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी उत्पन्न मिळवण्यासाठी अन्न व पेय पदार्थांची विक्री हे उत्पन्नाचे उत्तम साधन असते.
रेखाला आहेत ६ बहिणी! कुणी प्रसिद्ध डॉक्टर तर कुणी लोकप्रिय अँक्टर...
प्रेक्षकांना आहे 'हा' अधिकार!
चित्रपटगृहात पोहोचणाऱ्या लोकांना खाद्यपदार्थ विकत न घेण्याचा अधिकार असतो. हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. अनेक वेळा थिएटर मालक तिकीटाची किंमत कमी करतात, जेणेकरून लोक मोठ्या संख्येने तिथे पोहोचतात आणि नंतर मग ते खाद्यपदार्थ्यांच्या व इतर वस्तूंद्वारे कमाई करू शकतील. पण तरीही आपण पॉपकॉर्न (किंवा खाद्यपदार्थ) विकत घ्यायचे की नाही, हे प्रेक्षक स्वत: ठरवू शकतात.