मधुचंद्राच्या रात्री रूम फुलांनी का सजवली जाते? 99 टक्के लोकांना माहीत नसेल याचं कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 06:32 PM2023-02-20T18:32:25+5:302023-02-20T18:32:50+5:30
Wedding Night Bedroom Decoration : नव्या जोडप्याची रूम समजवण्याचा रिवाज सगळेच करतात. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की, नव्या जोडप्याची रूम इतकी का सजवली जाते? आज याचं उत्तर जाणून घ्या.
Wedding Night Bedroom Decoration : हिंदू धर्मात लग्नाच्या बंधनाला फारच पवित्र मानलं जातं. तुम्ही सगळ्यांनी सिनेमात पाहिलं असेल की, मधुचंद्राच्या रात्री नवरी-नवरदेवाची रूम फुलांनी सजवली जाते. त्याशिवाय रूममध्ये सुगंधासाठी स्प्रे सुद्धा मारला जातो. लोक आपल्या आवडीनुसार रूम सजवण्यासाठी फुलांची निवड करतात. नव्या जोडप्याची रूम समजवण्याचा रिवाज सगळेच करतात. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की, नव्या जोडप्याची रूम इतकी का सजवली जाते? आज याचं उत्तर जाणून घ्या.
काय आहे यामागचं कारण?
अशी मान्यता आहे की, लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्री रूममध्ये सजावट करण्याची अनेक कारणे आहेत. असं मानलं जातं की, नवरी आणि नवरदेवाच रूम सजवल्यावर त्यांचं आयुष्य फुलांसारखं दरवळत राहतं आणि नव्या आयुष्याची सुरूवातही फुलांसारखी सुंदर होते. पहिल्या दिवशी वातावरण रोमॅंटिक करण्यासाठी रूमममध्ये असं केलं जातं. अनेक लोक रूममध्ये फुलांसोबत मिठाईही ठेवतात. असं केल्याने नवरी-नवरदेवाच्या आयुष्यात गोडवा येतो असं मानलं जातं. त्याशिवाय वैज्ञानिक कारण म्हणजे फूल आणि त्यांच्या सुगंधाने कामेच्छा वाढण्यास मदत मिळते. त्यामुळेच रूममध्ये फुलं लावली जातात.
मधुचंद्राच्या रात्री रूम सजवण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा वापर केला जातो. त्याशिवाय लॅंवेंडरच्या सुगंधाचे अत्तर आणि त्यांच्या फुलांचा वापर केला जातो. रूमच्या लूक रोमॅंटिक करण्यासाठी कॅंडल लावले जातात. तसेच वेगवेगळ्या डिझाइनचा वापर केला जातो.