कंपनी वेगवेगळ्या पण बीअरच्या बॉटलचा रंग नेहमी हिरवा किंवा भुरकाच का असतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 04:29 PM2023-12-12T16:29:56+5:302023-12-12T16:30:17+5:30

वेगवेगळ्या कंपनीच्या असूनही बीअर नेहमी हिरव्या किंवा ब्राउन रंगाच्या बॉटलमध्येच का असते?

Why is the color of the beer bottle always green or brown, know the reason | कंपनी वेगवेगळ्या पण बीअरच्या बॉटलचा रंग नेहमी हिरवा किंवा भुरकाच का असतो?

कंपनी वेगवेगळ्या पण बीअरच्या बॉटलचा रंग नेहमी हिरवा किंवा भुरकाच का असतो?

दारूचा विषय आला की जगभरात सर्वात जास्त बीअर हीच प्यायली जाते. काही लोक दारू पितात कारण त्यांना सवय असते तर काही लोक केवळ एन्जॉय करण्यासाठी पितात. तुम्हीही कधीना कधी बीअर प्यायली असेल. पण कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं का की, वेगवेगळ्या कंपनीच्या असूनही बीअर नेहमी हिरव्या किंवा ब्राउन रंगाच्या बॉटलमध्येच का असते?

असं मानलं जातं की, हजारो वर्षाआधी बीअरची पहिली कंपनी प्राचीन इजिप्तमध्ये उघडण्यात आली होती. तेव्हा बीअर ट्रान्सपरंट बॉटलमध्ये पॅक केली जात होती. यानंतर काही ब्रुअर्सच्या लक्षात आलं की, बीअर पांढऱ्या बॉटलमध्ये पॅक केल्याने त्यातील अ‍ॅसिड सूर्य किरणातील अल्ट्रा वॉयलेट रेंजने खराब होतं. ज्यामुळे बीअरची दुर्गंधी येऊ लागते आणि लोक बीअर पिणं टाळू लागले होते.

काय आहे कारण? 

बीअर तयार करणाऱ्या कंपनीने ही समस्या दूर करण्यासाठी एक योजना बनवली. ज्यानुसार त्यांनी बीअरसाठी भुरक्या रंगाची बॉटल निवडली. त्यांचा हा फॉर्म्युला यशस्वी ठरला आणि भुरक्या रंगाच्या बॉटलवर सूर्य किरणांचा काहीच प्रभाव पडत नाही. ज्यामुळे बीअरची टेस्ट आणि सुगंध दोन्ही चांगले राहत होते.

हिरव्या रंगाच्या बॉटलची सुरूवात

बीअरसाठी हिरव्या रंगाच्या बॉटलचा वापर दुसऱ्या महायुद्धा दरम्यान सुरू झाला. कारण तेव्हा भुरक्या रंगाच्या बॉटलचा तुटवडा जाणवू लागला होता. बीअर बनवणाऱ्या कंपनीने असा रंग निवडला होता, ज्यावर सूर्यकिरणांचा काही वाईट परिणाम होत नव्हता. त्यामुळे फार विचार करून बीअरसाठी हिरव्या किंवा भुरक्या रंगाची निवड केली गेली आहे.

Web Title: Why is the color of the beer bottle always green or brown, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.