जगातल्या सगळ्या प्राण्यांच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 11:28 AM2023-04-27T11:28:33+5:302023-04-27T11:28:53+5:30

Why is Colour of Milk White: कोणत्याही प्राण्याच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? जर तुम्ही याचा विचार केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहोत. चला जाणू घेऊ यामागचं कारण....

Why is the colour of milk of all animals in the world white know reason | जगातल्या सगळ्या प्राण्यांच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर

जगातल्या सगळ्या प्राण्यांच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर

googlenewsNext

Why is Colour of Milk White: तुम्ही दूध तर अनेकदा प्यायले असाल. सोबतच दुधाचा चहा, कॉफी, दही, लोणी यांचंही सेवन केलं असेल. दुधापासून तयार चीज, पनीरचंही अनेकदा सेवन केलं असेल. पण तुम्ही कधी याचा विचार केलाय का की, दुधाचा रंग पांढराच का असतो? तसेच जगातल्या कोणत्याही प्राण्याच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? जर तुम्ही याचा विचार केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहोत. चला जाणू घेऊ यामागचं कारण....

का असतो दुधाचा रंग पांढरा?

दुधात एकप्रकारचं प्रोटीन आढळतं ज्याला कॅसिन असं म्हटलं जातं. या कॅसिनमुळेच दुधाचा रंग पांढरा होतो. कॅसिन दुधातील कॅल्शिअम आणि फॉस्फेटसोबत मिळून छोटे छोटे कण तयार करतं आणि या कणांना मिसेल म्हटलं जातं. 

जेव्हा लाइट या मिसेलवर पडतो तेव्हा ते रिफ्लेक्ट होऊन तुटतं आणि त्याच रिफ्लेक्शनुमळे आपल्याला दुधाचा रंग पांढरा दिसू लागतो. त्याशिवाय दुधात असलेल्या फॅटमुळेही दुधाचा रंग पांढरा दिसतो.

गायीचं दूध असतं हलकं पिवळं

तुम्ही कधीना कधी लक्ष दिलं असेल की, गायीचं दूध हे म्हशीच्या दुधाच्या तुलनेत थोडं पिवळं असतं. हेच कारण आहे की, गायीचं दूध म्हशीच्या दुधापेक्षा थोडं पातळ असतं. याचं कारण गायीच्या दुधात फॅटचं प्रमाण कमी असतं. त्याशिवाय यात कॅसिनचं प्रमाणही कमी असतं. ज्यामुळे गायीचं दूध हलकं पिवळं दिसतं.
 

Web Title: Why is the colour of milk of all animals in the world white know reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.