बाथरूममधील कमोड किंवा वॉश बेसिन पांढऱ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 01:13 PM2023-04-19T13:13:32+5:302023-04-19T13:13:51+5:30

Bathroom Commode And Wash Basin Colour : तुम्ही कधी याचा विचार केलाय का की, बाथरूममध्ये वॉश बेसिन आणि कमोड जास्तकरून पांढऱ्या रंगाचंच का असतं? चला जाणून घेऊ याचं कारण...

Why is the commode or basin in the bathroom mostly white | बाथरूममधील कमोड किंवा वॉश बेसिन पांढऱ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या कारण...

बाथरूममधील कमोड किंवा वॉश बेसिन पांढऱ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या कारण...

googlenewsNext

Bathroom Commode And Wash Basin Colour : आपल्या दैनंदिन क्रियांसाठी प्रत्येक व्यक्ती बाथरूमचा वापर करतो. बाथरूममध्ये वॉश बेसिन, टॉयलेट असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. आता बाथरूममध्ये टूथपेस्ट, टूथब्रश, साबण आणि शाम्पू ठेवण्याच्या वस्तू असतातच. पण तुम्ही कधी याचा विचार केलाय का की, बाथरूममध्ये वॉश बेसिन आणि कमोड जास्तकरून पांढऱ्या रंगाचंच का असतं? चला जाणून घेऊ याचं कारण...

तसे तर बाजारात सध्या वेगवेगळ्या रंगाचे वॉश बेसिन आणि कमोड असतात. पण जास्तीत जास्त ते पांढऱ्या रंगाचेच वापरले जातात. पण याचं कारण काय याचा कुणी विचार करत नाहीत. चला आज जाणून घेऊ याचं कारण...

जसं की, काही लोकांना वाटतं की, पांढऱ्या रंगाचं कमोड किंवा वॉश बेसिन टॉयलेटमध्ये चांगलं वाटतं. काही लोकांना वाटतं की, त्यावरील डाग-घाण लगेच दिसते म्हणजे ते पांढरे राहत असतील. पण हे सत्य नाहीये. मुद्दा कमोड किंवा वॉश बेसिनच्या मेटरिअलचा आहे. दोन्ही वस्तू बनवण्यासाठी जे मटेरिअल वापरलं जातं त्याला सिरॅमिक किंवा पोर्सिलेन म्हटलं जातं. त्याला सामान्य भाषेत चीनी माती म्हटलं जातं. याचा रंग पांढरा असतो. 

आजकाल लोकांच्या डिमांडनुसार, सिरॅमिकमध्ये बाथरूमच्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्या गुलाबी, पिवळ्या, निळ्या आणि हिरव्या रंगाचे कमोड बनवू लागले आहेत. पण डिमांड जास्त अजूनही पांढऱ्या रंगाची आहे. सिरॅमिकमध्ये दुसरे रंग मिक्स केल्याने याच्या क्वालिटीवर प्रभाव पडतो. कलर जास्त दिवस टिकत नाही. 

सिरॅमिक किंवा पोर्सिलेन किंवा चीनी मातीला सिलिका (Silicon Dioxide), एलुमिना (Aluminium Oxide), मॅग्नेशिया (Magnesium hydroxide), बोरान ऑक्साइड (Boron Oxide) आणि ज़र्कोनियम (Zirconium) इत्यादींपासून बनवलं जातं. याने कमोड आणि वॉश बेसिनसोबतच लहान मुलांची खेळणी, टाइल्स आणि काही भांडीही बनवली जातात.

Web Title: Why is the commode or basin in the bathroom mostly white

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.