पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 09:34 AM2023-05-20T09:34:23+5:302023-05-20T09:34:48+5:30

Mark On Water Bottle: तसं तर पाणी कधी खराब होत नसतं आणि जर पाणी स्वच्छ असेल तर बरेच दिवस साठवून ठेवलं जाऊ शकतं. पण तरीही बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते?

Why is the expiry date written on the water bottle | पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

googlenewsNext

Mark On Water Bottle: सध्या उन्हाचा चांगलाच तडाखा वाढला आहे. अशात लोक भरपूर पाणी पितात. पण याचीही काळजी घेतली पाहिजे की, आपण स्वच्छ आणि शुद्ध पाणी पित आहोत. यादरम्यान लोक अलिकडे बॉटलचं पाणी भरपूर पितात जे चांगलं मानलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का की, पाण्याच्या बॉटलवरही एक्सपायरी डेट लिहिलेली असते. तसं तर पाणी कधी खराब होत नसतं आणि जर पाणी स्वच्छ असेल तर बरेच दिवस साठवून ठेवलं जाऊ शकतं. पण तरीही बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? जर तुम्हाला माहीत नसेल याचं उत्तर तर जाणून घ्या...

पाण्याची नसते एक्सपायरी डेट

एक्सपर्ट्सनुसार, पाण्याची एक्सपायरी डेट नसते. पण पाणी स्टोर करण्यासाठी ज्या प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला जातो त्याची एक्सपायरी डेट नक्कीच असते. याच कारणाने पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. असं सांगितलं जातं की, ही एक्सपायरी डेट ग्राहकाला हे दर्शवते की, बंद करण्यात आलेल्या वस्तुची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. बॉटलमधील पाण्याची एक्सपायरी डेट त्याच्या उच्च गुणवत्तेसाठी निर्धारित केली जाते.

बंद पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षा?

सोबतच पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते कारण ग्राहकाला सांगता यावं की, बॉटलमध्ये बंद पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. या तारखेनंतर पाण्याच्या गुणवत्तेवर प्रभाव पडू शकतो आणि याचं सेवन नुकसानकारक ठरू शकतं. हे सुरक्षा आणि आरोग्यासाठी महत्वाचं आहे.

बॉटलची एक्सपायरी डेट

एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, एक्सपायरी डेटनंतर पाण्याची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते आणि याचं सेवन सुरक्षित असू शकत नाही. जर एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर ग्राहकांनी त्यातील पाणी पिऊ नये. हेही खरं आहे की, एका कालावधीनंतर  प्लास्टिक पाण्यात मिक्स होणं सुरू होतं आणि याच कारणाने पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते.

Web Title: Why is the expiry date written on the water bottle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.