समुद्र सपाटीपासून का मोजली जाते रेल्वे स्टेशनची उंची? रंजक आहे त्यामागचं कारण, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 03:52 PM2023-03-19T15:52:40+5:302023-03-19T15:54:01+5:30

भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हटले जाते. रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात.

Why is the height of a railway station measured from sea level The reason behind it is interesting know details | समुद्र सपाटीपासून का मोजली जाते रेल्वे स्टेशनची उंची? रंजक आहे त्यामागचं कारण, जाणून घ्या

समुद्र सपाटीपासून का मोजली जाते रेल्वे स्टेशनची उंची? रंजक आहे त्यामागचं कारण, जाणून घ्या

googlenewsNext

भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हटले जाते. रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवास करताना रेल्वे स्थानकांवर तुम्ही मोठ्या अक्षरात स्टेशनचं नाव लिहिलेलं पाहिलं असे. स्टेशनचं नाव लिहिण्यात आलेल्या बोर्डावर खालच्या बाजूला समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिलेली वाचली तुम्ही पाहिली असेल. HT Above MSL 79.273 M असा उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी दिसला असेल. पण रेल्वेच्या साईन बोर्डावर समुद्र सपाटीपासूनची उंची का नोंद केली जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? जर माहिती नसेल तर याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

देशातील जवळपास सर्वच रेल्वे स्टेशनच्या साईन बोर्डावर समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिलेली असते. तसं पाहिलं तर सर्वसामान्यांच्या दृष्टीनं याचा काही खास उपयोग नसतो. मात्र ट्रेनचं लोको पायलट आणि गार्डच्या दृष्टीनं याला फार महत्त्व असते. रेल्वे स्टेशनवर समुद्र सपाटीपासून उंचीचा ऊल्लेख हा लोको पायलट आणि गार्डच्या मदतीसाठी केला जातो. त्यामुळे ते ट्रेन किती उंचीच्या दिशेने घेऊन जात आहेत, याचा अंदाज त्यांना मिळतो. त्यामुळे ट्रेनची गती किती ठेवायची, ट्रेनच्या इंजिनाला किती पॉवर द्यायची, याबाबत ट्रेनचालक अचूक माहिती मिळते.

तसंच जर ट्रेन समुद्र सपाटीपासून खालच्या दिशेने जात असेल तर ड्रायव्हरला ट्रेनची गती किती ठेवायची. फ्रिक्शन किती लावावं लागेल, या सर्वांबाबतचा अंदाज घेण्यासाठी समुद्र सपाटीपासून उंची लिहिली जाते. आपली पृथ्वी गोल आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठराविक अंतराने थोडा कर्व येतो. मात्र जमिनीची उंची मोजण्यासाठी एका अशा पॉईंटची गरज असते जो समान राहील. समुद्र यासाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे उंची मोजण्यासाठी समुद्र सपाटीपासून विचार केला जातो. 

Web Title: Why is the height of a railway station measured from sea level The reason behind it is interesting know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे