स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते? जगात सर्वत्र हाच नियम; जाणून घ्या वैज्ञानिक कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 03:57 PM2023-01-24T15:57:03+5:302023-01-24T15:57:44+5:30

या बैठकीत अमेरिकेतील हायली एज्यूकेटेड टिचर्स, ट्रांसपोर्टेशन ऑफिसर्स आणि बस तयार करणाऱ्या इंजिनिअर्सनी सहभाग घेतला होता.

Why is the school bus yellow color know about the scientific reason | स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते? जगात सर्वत्र हाच नियम; जाणून घ्या वैज्ञानिक कारण!

स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते? जगात सर्वत्र हाच नियम; जाणून घ्या वैज्ञानिक कारण!

googlenewsNext

आपण रस्त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या गाड्या बघता. मात्र, स्कूल बस नेहमी पिवळ्या रंगाचीच का असते? यावर आपण कधी विचार केला आहे का? जर यासंदर्भात आपल्याला माहिती नसेल, तर आज आम्ही आपल्याला या मागचे वैज्ञानिक कारण सांगणार आहोत. पण स्कूल बसचा रंग पिवळा असण्यामागील कारण जाणून घेण्यापूर्वी याची सुरवात केव्हा आणि कुठे झाली? हे जाणून घेणेही आश्यक आहे. 

पिवळ्या रंगाचीच का असते स्कूल बस? -
एक वेबसाईट How Stuff Works च्या वृत्तानुसार, अमेरिकेपासून या पिवळ्या रंगाच्या बसची सुरुवात झाली. येथे कोलंबिया विद्यापीठात शिकवणाऱ्या शिक्षकांनी 1930 च्या दशकात हा निर्णय घेतला होता. या विद्यापीठातील प्रोफेसर फ्रँक सायर (Frank Cyr) यांनी यासंदर्भात संशोधन सुरू केले. स्कूल ट्रांसपोर्टेशनशी संबंधित संशोधनात त्यांनी न्यू यॉर्क टाईम्सच्या एका मुलाखतीत सांगितले की, तेव्हा स्कूल बससंदर्भात कुठळ्याही प्रकारचे कायदे नव्हते. यानंतर शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेसंदर्भात एक बैठक बोलावण्यात आली आणि नंतर, बसचा रंग कसा असावा हे निश्चित करण्यात आले.

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात झाले संशोधन -
या बैठकीत अमेरिकेतील हायली एज्यूकेटेड टिचर्स, ट्रांसपोर्टेशन ऑफिसर्स आणि बस तयार करणाऱ्या इंजिनिअर्सनी सहभाग घेतला होता. बसचा रंग कुठला असायला हवा, हे या सर्वांनी मिळून निश्चित केले. मीटिंगदरम्यान भिंतीवर अनेक रंग चिकटवण्यात आले आणि लोकांना एक रंग निवडण्यास सांगितले गेले. यावर पिवळा आणि केशरी रंग अधिक व्हिजिबल असल्याच्या निष्कर्शावर ते पोहोचले. लोकांनी पिवळा रंग निवडला. तेव्हा पासूनच स्कूलबसचा रंग पिवळा झाला. तेव्हापासून लोक याच रंगाला फॉलो करत आहेत.

असं आहे वैज्ञानिक कारण? -
वैज्ञानिकांच्या मते, पिवळा रंग हा मानवी डोळ्यांनी फार पटकन दिसतो. पिवळ रंग व्हिजिबिलिटी स्पेक्ट्रममध्ये सरवात टॉपवर असतो. कारण आपल्या डोळ्यात एक सेल असते, जिला फोटोरिसेप्टर म्हटले जाते. याशिवाय मानाच्या डोळ्यात तीन प्रकारचे कोन असतात. पहिला रंग लाल, दुसरा हिरवा आणि तिसरा निळ्या रंगाचा कोन असतो. हे रंग डिटेक्ट करतात. यामुळे डोळ्यांना पिवळा रंग सर्वाधिक दिसून येतो. 

 

Web Title: Why is the school bus yellow color know about the scientific reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.