विहिरीचा आकार गोलच का असतो, त्रिकोणी किंवा चौकोनी का नाही? कधी विचार केलाय, असं आहे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 05:49 PM2023-03-08T17:49:38+5:302023-03-08T17:50:27+5:30

Knowledge: बहुतांश विहिरींचा आकार हा गोलाकार असतो. तुम्ही विहिरींचा आकार गोलच का असतो, हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केलाय का.

Why is the shape of the well circular and not triangular or square? Ever thought, that's the reason | विहिरीचा आकार गोलच का असतो, त्रिकोणी किंवा चौकोनी का नाही? कधी विचार केलाय, असं आहे कारण 

विहिरीचा आकार गोलच का असतो, त्रिकोणी किंवा चौकोनी का नाही? कधी विचार केलाय, असं आहे कारण 

googlenewsNext

 प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या राहणीमानामध्ये खूप बदल झालेला आहे. आजचं मानवी जीवन खूपच सोपं बनलेलं आहे. मात्र आधी काम करण्यासाठी खूप गुंतागुंतीचे मार्ग अवलंबले जायचे. आधीच्या काळात पाण्यासाठी लोक नदी किंवा तलावांवर अवलंबून होते. मात्र नंतर माणसाने स्वत:ची बुद्धिमत्ता पणाला लावत खोदकाम करून पाणी शोधण्यास सुरुवात केली. त्यांना विहिर म्हटलं जातं. आज अनेक ठिकाणी विहिरी दिसतात. मात्र बहुतांश विहिरींचा आकार हा गोलाकार असतो. तुम्ही विहिरींचा आकार गोलच का असतो, हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केलाय का. तर त्यामागेही एक शास्त्रीय कारण आहे. ते कारण आज आम्ही सांगणार आहोत.

विहिरीचं बांधकाम करण्यासाठी षट्कोनी, त्रिकोणी, गोल असे पर्याय उपलब्ध असताना विहिरींचं बांधकाम करण्यासाठी बहुतांशी गोलाकारच बांधकाम केलं जातं, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे विहिरीचं आयुर्मान वाढावं, यासाठी विहीर ही गोलाकार बांधली जाते. विहिर ही त्रिकोणी किंवा चौकोनी आकारातही बांधता येऊ शकते. मात्र तसं केल्यास त्या विहिरीचं आयुर्मान फार नसेल.

विहिरीचं बांधकाम गोलाकार करण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे, ते म्हणजे विहिरीत खूप पाणी साठलेलं असतं, अशा परिस्थितीत विहिरीला जितके कोन अधिक असतील तेवढा पाण्याचा दाब त्यावर अधिक पडतो. त्यामुळे त्यात लवकर तडे जाण्याची आणि विहीर कोसळण्याची शक्यता असते. मात्र विहीर गोलाकार असल्यात पाण्याचा दबाव हा एक समान पद्धतीने पडतो. त्यामुळे अशा विहिरी वर्षानुवर्षे सुरक्षित स्थितीत राहतात.   

Web Title: Why is the shape of the well circular and not triangular or square? Ever thought, that's the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.