टॉयलेट पेपरचा रंग नेहमी पांढराच का असतो? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 09:36 AM2023-07-31T09:36:30+5:302023-07-31T09:38:53+5:30

Toilet Paper: सामान्यपणे टॉयलेट पेपरचा वापर वॉशरूममध्ये केला जातो. यासोबतच याच्याशी मिळत्या जुळत्या टिशू पेपरचाही खूप वापर केला जातो.

Why is toilet paper made only white in Colour? know the reason | टॉयलेट पेपरचा रंग नेहमी पांढराच का असतो? जाणून घ्या कारण...

टॉयलेट पेपरचा रंग नेहमी पांढराच का असतो? जाणून घ्या कारण...

googlenewsNext

Toilet Paper: वॉशरूममध्ये वापरला जाणारा टॉयलेट पेपर सेल्यूलोज फायबरपासून तयार केला जातो. हा झाडापासून किंवा कागदांनाच रिसायकल करून तयार केला जातो. पण याला पांढरं बनवण्याची वेगवेगळी कारणं आहेत. चला जाणून घेऊ ती काय...

सामान्यपणे टॉयलेट पेपरचा वापर वॉशरूममध्ये केला जातो. यासोबतच याच्याशी मिळत्या जुळत्या टिशू पेपरचाही खूप वापर केला जातो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, हे पेपर पांढरेच का असतात? टॉयलेट पेपर एका खास फायबरपासून तयार केला जातो. ज्याला सेल्यूलोज फायबर म्हणतात.

मुळात ज्या फायबरपासून टॉयलेट पेपर तयार केला जातो ते नैसर्गिकपणे पांढरं असतं. पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान यात ब्लीचचा वापर केला जातो त्यामुळे यातील घाणं निघून जाते. अशात तो अधिक पांढरा होतो.

टॉयलेट पेपर रद्दीपासूनही तयार केला जातो. जुन्या वापरलेल्या पेपर आणि रद्दीच्या पेपरपासून तयार केला जातो. एक कारण असंही सांगितलं जातं की, याला जर रंगीबेरंगी बनवलं तर याचा वापर करताना तो रंग सोडू शकतो.

असंही सांगण्या येतं की, रंगीबेरंगी टॉयलेट पेपर हेल्थच्या दृष्टीनेही चांगला मानला जात नाही. डॉक्टर सुद्धा पांढराच टॉयलेट पेपर वापरण्याचा सल्ला देतात. त्याशिवाय पांढऱ्या पेपरल इको-फ्रेंडली सुद्धा मानलं जातं आणि याला डिकम्पोज करणंही सोपं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खूपआधी टॉयलेटमध्ये रंगीत पेपरचा वापर केला जात होता.
 

Web Title: Why is toilet paper made only white in Colour? know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.