Knowledge Quiz : पाणी ओलं का असतं? या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर आपण आहात जिनिअस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 01:52 PM2022-11-28T13:52:35+5:302022-11-28T13:54:00+5:30

पाणी ओले का असते? जर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर माहित असेल, तर आपण एक जिनिअस व्यक्ती आहात. तर जाणून घेऊयात पाणी ओले असण्यामागील काय आहे नेमके कारण?

Why is water wet If you know the answer to this question, you are a genius Know about science logic behind it | Knowledge Quiz : पाणी ओलं का असतं? या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर आपण आहात जिनिअस

Knowledge Quiz : पाणी ओलं का असतं? या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर आपण आहात जिनिअस

googlenewsNext


आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही विज्ञान असते. यासंदर्भात आपल्यालाही माहिती असणे आवश्यक आहे. पाण्याशी संबंधित, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या जाणून आपणही आश्चर्यचकित व्हाल. असाच एक प्रश्न सरकारी नोकरीच्या मुलाखतींमध्येही अनेक वेळा विचारला जातो. हा प्रश्न म्हणजे, पाणी ओले का असते? जर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर माहित असेल, तर आपण एक जिनिअस व्यक्ती आहात. तर जाणून घेऊयात पाणी ओले असण्यामागील काय आहे नेमके कारण?

पाणी ओले का असते? -
खरे तर पाणी हायड्रोजनच्या दोन तर ऑक्सिजनच्या एका अणूपासून बनलेले असते. पाण्यातील ऑक्सिजनमध्ये ओलावा असतो आणि यामुळेच पाणी ओले असते. पाणी हातात घेतल्यानंतर ते ओले लागण्यामागे विज्ञान आहे.

पाण्याशी संबंधित आही इंटरेस्टिंग फॅक्ट्स -
आपल्याला माहीत असायला हवे, की पृथ्वीवर 326 मिलियन ट्रिलियन गॅलन पाणी आहे. यापैकी 97 टक्के पाणी एकट्या समुद्रात आहे आणि समुद्रात असलेले पाणी खारट आहे. यामुळे याचा वापर पिण्यासाठी केला जाऊ शकत नाही. याशिवाय 2 टक्के पाणी ग्लेशर्सच्या आइस कॅप्सच्या स्वरुपात आहे. या पाण्याचा वापरही मानव करू शकत नाही.

पृथ्वीवर पिण्याचे पाणी किती? -
महत्वाचे म्हणजे, पृथ्वीवरील केवळ 1 टक्के पाण्याचा वापरच पिण्याचे पाणी म्हणून केला जाऊ शकतो. यामुळे पाणी जपून वापरा, असे सांगितले जाते. याशिवाय माणसाच्या शरिरातील एक टक्का पाणी जेव्हा कमी होते, तेव्हा त्याला तहाण लागायला लागते. विकसनशील देशांमध्ये, दोन तृतीयांशपेक्षाही अधिक आजार पाण्याशी संबंधित असतात.

Web Title: Why is water wet If you know the answer to this question, you are a genius Know about science logic behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.