जपानी लोक दाढी का ठेवत नाहीत? जाणून घ्या या मागचं कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 12:28 PM2023-10-05T12:28:35+5:302023-10-05T12:30:10+5:30
जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये पुरूष दाढी आणि मिश्यांना त्यांच्या पुरुषार्थाचं प्रतिक मानतात. पण मग जपानी लोकांमध्ये पुरुषार्थ नसतो का?
Japanese young beard news: जर तुम्ही जपानी लोक पाहिले असतील तर जास्तीत जास्त लोक तुम्हाला चेहऱ्यावर दाढी नसलेले दिसतील. अशात अनेकांना हा प्रश्न पडतो की, जपानी लोक दाढी का ठेवत नाहीत? जपानी लोक मुद्दामहून दाढी ठेवत नाहीत की यामागे काही आनुवांशिक कारण आहे. उलट थंड भागांमधील लोकांच्या शरीरावर जास्त केस येतात. जपानमध्येही जास्तकरून थंड वातावरण असतं.
जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये पुरूष दाढी आणि मिश्यांना त्यांच्या पुरुषार्थाचं प्रतिक मानतात. पण मग जपानी लोकांमध्ये पुरुषार्थ नसतो का? अशात चला जाणून घेऊ जपानी लोक दाढी किंवा मिशा का ठेवत नाहीत. ते नेहमी क्लीन शेव का असतात? त्यांच्या चेहऱ्यावर दाढीसाठी पुरेसे केस येत नाहीत का?
चेहरा आणि शरीरावरील केसांसाठी हार्मोन आणि जीन जबाबदार असतात.
जपानमध्ये ईडीएआर जीनच्या कारणामुळे पुरेसे केस येत नाहीत. त्यासोबतच चेहऱ्यावर दाढीसाठी टेस्टोस्टेरोन(testosterone) हार्मोन गरजेचे असतात. जर 19 ते 38 वयाच्या मुलांबाबत सांगायचं झालं तर शरीरावर केसांसाठी याचं प्रमाण 264 ते 916 नॅनोग्राम प्रति डेसीलीटर असायला हवं. पण हे प्रमाण कमी होतं. याचा अर्थ हा आहे की, त्यांच्या चेहऱ्यावर दाढी येऊ शकते. पण मग नेमकं कारण काय आहे?
सामान्यपणे शरीर आणि चेहऱ्यावरील केस पुरूषांसाठी पुरुषार्थ मानले जातात. तेच काही देशांमध्ये चेहऱ्यावरील केसांकडे अस्वच्छतेच्या दृष्टीने पाहिलं जातं. काही लोक असं मानतात की, ज्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जास्त केस असतात ते लोक घाणेरडे, अस्वच्छ आणि आळशी मानले जातात. हेच कारण आहे की, जपानी लोक दाढी ठेवणं पसंत करत नाहीत. हे लोक डोळ्यांना सुंदरतेचं प्रतिक मानतात.