गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावल्यावर न्यायाधीश पेनाची निप का तोडतात? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 03:23 PM2021-05-27T15:23:58+5:302021-05-27T15:26:59+5:30
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत असेल की, फाशीची शिक्षा सुनावल्या न्यायाधीश पेनाची निप तोडतात. पण ते पेनाची निप का तोडतात?
भारतात असे अनेक गुन्हे घडले आहेत ज्यासाठी कोर्टाने गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोणत्याही न्यायाधीशासाठी फाशीची शिक्षा सुनावणं सोपं नसतं. पण काही गुन्ह्यासाठी अशी शिक्षा देण्याशिवाय दुसरा उपायही नसतो. त्यामुळे फार विचार केल्यानंतर नियमानुसार न्यायाधीश साहेबांना हा निर्णय घ्यावा लागतो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत असेल की, फाशीची शिक्षा सुनावल्या न्यायाधीश पेनाची निप तोडतात. पण ते पेनाची निप का तोडतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर आज आम्ही देणार आहोत.
काय तोडतात पेनाची निप?
फाशीची शिक्षा सुनावल्यावर न्यायाधीश पेनाची निप तोडतात आणि असं करण्याला सिम्बॉलिक अॅक्ट म्हटलं जातं. स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदा पेनाची निप १९४९ मध्ये तोडली गेली होती. तेव्हा महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी नथूराम गोडसे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पंजाब उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गोडसेला फाशीची शिक्षा सुनावली होती आणि त्यानंतर पेनाची निप तोडली होती. (हे पण वाचा :भारतीय नाण्यांवर वर्षाच्या खाली डॉट, स्टार अशी चिन्हे का असतात? जाणून घ्या अर्थ.....)
असं करण्याचं एक कारण नाही. यासाठी अनेक कारणे आहेत. असं म्हटलं जातं की, न्यायाधीशांसाठी कोणत्याही व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावणं फार कठिण असतं. ते पेनाची निप तोडून शिक्षा सुनावताना आतून होत असलेल्या त्रासाला व्यक्त करतात. यासोबतच त्यांचा असाही मानस असतो की, आता त्यांना पुन्हा अशाप्रकारची शिक्षा सुनावण्याची वेळ येऊ नये. (हे पण वाचा : Interesting Facts : रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X असा साइन का दिलेला असतो? वाचा काय आहे कारण....)
त्यासोबतच असंही म्हटलं जातं की, न्यायाधीश पेनाची निप तोडतात कारण की, त्यांचा हा निर्णय बदलला जाऊ नये म्हणून. उच्च न्यायालय आणि राष्ट्रपती यांच्याशिवाय न्यायाधीशांचा निर्णय कुणीही बदलू शकत नाही. इतकंच काय तर स्वत: न्यायाधीशही नाही. त्यामुळेच पेनाची निप तोडून न्यायाधीश हे स्पष्ट करतात की, फाशीची शिक्षा सुनावल्यावर ती बदलली जाऊ शकत नाही.
न्यायाधीशांकडून पेनाची निप तोडण्याचं आणखी एक कारण आहे असं म्हटलं जातं की, न्यायाधीश पेनाची निप यासाठी तोडतात कारण तो पेन पुन्हा वापरला जाऊ नये. कारण त्या पेनाने एका व्यक्तीचा मृत्यू लिहिला जातो.