पूर्वी कबुतरांच्याच माध्यमातून का पाठवलं जात होतं पत्र? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 06:16 PM2022-06-08T18:16:14+5:302022-06-08T18:19:36+5:30
Science Logic: कधी विचार केलाय का की, या कामासाठी फक्त कबुतरांचाच वापर का केला जात होता? जगात इतरही अनेक पक्षी आहेत त्यांच्याकडून हे काम का करून घेतलं जात नव्हतं?
Science Logic: एक काळ होता जेव्हा दूर असलेल्या गावातील नातेवाईकांचा हालचाल पत्रांच्या माध्यमातून घेतला जात होता. त्यावेळी लोक कबुतरांच्या माध्यमातून पत्र बाहेरगावी पाठवत होते. ही एक लांब प्रक्रिया आहे. अनेक सिनेमातही तुम्ही कबुतरांद्वारे पत्र पाठवताना पाहिलं असेल. पण कधी विचार केलाय का की, या कामासाठी फक्त कबुतरांचाच वापर का केला जात होता? जगात इतरही अनेक पक्षी आहेत त्यांच्याकडून हे काम का करून घेतलं जात नव्हतं?
पत्र कबुतरांमार्फतच पाठवण्यामागे एक फार मोठा वैज्ञानिक कारण आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, कबुतरांच्या शरीरात एक अशी फंक्शनॅलिटी असते जी एकप्रकारे जीपीएससारखी काम करते. हेच कारण आहे की, कबूतर कधीच आपला रस्ता विसरत नाहीत.
वैज्ञानिकांचं तर असंही मत आहे की, कबुतरांमध्ये रस्ता शोधण्यासाठी मॅग्नेटो रिसेप्शन स्कीलही आढळून येतात. अशात कबूतर त्यांचा ठिकाणा सहजपणे शोधतात. त्यासोबतच कबुतरांमध्ये 53 विशेष कोशिका असतात, ज्या त्यांच्यासाठी दिशादर्शकाचं काम करतात.
तुम्हाला हेही वाचून आश्चर्य वाटेल की, कबुतरांच्या डोळ्यातील रेटिनामध्ये खासप्रकारचं प्रोटीन आढळून येतं. हेच सर्वात मुख्य कारण आहे की, आधीच्या काळात इतर कोणत्याही पक्ष्यांना सोडून पत्र पाठवण्यासाठी केवळ कबुतरांचा वापर केला जात होता.