कॅप्सूल दोन रंगाची का असते? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 03:52 PM2021-12-14T15:52:27+5:302021-12-14T15:59:29+5:30

Interesting Facts about capsule : तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का की, कॅप्सूल दोन रंगाचीच का असते? ती एका रंगाची का नाही? तुम्हालाही हे माहीत नसेल आज आम्ही तुम्हला मागचं वैज्ञानिक कारण सांगणार  आहोत.

Why is medicine capsule of two colour's, know the reason | कॅप्सूल दोन रंगाची का असते? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

कॅप्सूल दोन रंगाची का असते? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

googlenewsNext

आज प्रत्येक घरात औषधांसाठी (Medicine) एक वेगळा बॉक्स असतो. त्यात वेगवेगळ्या टॅबलेट्स, बॉटल्स ठेवलेल्या असतात. या बॉक्सकडे तुम्ही जर लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, कॅप्सूल (Capsule Colour) दोन रंगाची असतात. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का की, कॅप्सूल दोन रंगाचीच का असते? ती एका रंगाची का नाही? तुम्हालाही हे माहीत नसेल आज आम्ही तुम्हला मागचं वैज्ञानिक कारण सांगणार  आहोत.

दोन रंगाची का असते कॅप्सूल?

वेगवेगळ्या वेबसाइटनुसार, कॅप्सूलचे दोन भाग असतात आणि दोन्हींचा रंग वेगवेगळा असतो. हे असं असण्याचं कारण म्हणजे कॅप्सूलचा एक पार्ट कॅप आणि दुसरा कंटेनरचा असतो. कॅप्सूलच्या कंटेनरमध्ये औषध ठेवलं जातं आणि कॅपने ते झाकलं जातं. जर तुम्ही कॅप्सूल उघडून पाहिली तर तुम्हाला दिसेल की, कॅप्सूलच्या एका भागात औषध भरलेलं असतं आणि दुसरा रिकामा असतो.

कॅप्सूल दोन रंगाची असण्यामागचं कारण

कॅप्सूलची कॅप आणि कंटेनरचा रंग वेगवेगळा असतो. कारण कॅप्सूल तयार करणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून काही चूक होऊ नये. ते हे विसरू नये की, कॅप्सूलचा कोणता भाग कंटेनर आहे आणि कोणता भाग कॅप आहे. कॅप्सूसची कॅप आणि कंटेनरचा रंग वेगवेगळा ठेवण्यासाठी फार्मास्युटिकल कंपनींनी बराच खर्च करावा लागतो. 

कशापासून तयार होते कॅप्सूल?

औषधाची कॅप्सूल जिलेटिन आणि सॅलूलोज दोन्हींपासून तयार केली जाऊ शकते. काही देशांमध्ये जिलेटिनपासून कॅप्सूल तयार करण्यावर बंदी आहे. भारतातही  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आदेश जारी केला आहे की, कॅप्सूल तयार करण्यासाठी जिलेटिनऐवजी सॅलूलोचा वापर करावा.

तशा तर मार्केटमध्ये एका रंगांच्याही कॅप्सूल उपलब्ध आहेत. पण जास्तीत जास्त दोन रंगाच्या कॅप्सूल असतात. ज्याबाबत अनेकांना प्रश्न पडतात. 
 

Web Title: Why is medicine capsule of two colour's, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.