कोणत्या कारणांमुळे उन्हाळ्यात जास्त चावतात डास? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 12:07 PM2024-04-09T12:07:18+5:302024-04-09T12:07:36+5:30

प्रश्न हा आहे की, उन्हाळ्यात डास इतके का चावतात? यामागचं कारण काय आहे. तेच आज जाणून घेणार आहोत.

Why mosquitoes bite more in summer, know the reason | कोणत्या कारणांमुळे उन्हाळ्यात जास्त चावतात डास? जाणून घ्या कारण...

कोणत्या कारणांमुळे उन्हाळ्यात जास्त चावतात डास? जाणून घ्या कारण...

उन्हाळा सुरू झाला की, डासांची समस्या खूप जास्त वाढते. डासांमुळे अनेकांची झोप उडालेली असते. सायंकाळ होताच डास घरात धुमाकूळ घालणं सुरू करतात. पण प्रश्न हा आहे की, उन्हाळ्यात डास इतके का चावतात? यामागचं कारण काय आहे. तेच आज जाणून घेणार आहोत.

प्रजनन वाढतं

उन्हाळ्यात डास जास्त चावण्याचे हे एक मुख्य कारण आहे. उन्हाळा हा डासांचा प्रजननाचा काळ असतो. खासकरून उन्हाळ्याच्या सुरूवातीला डास प्रजनन करतात. अशात मादा डासांना अंडी देण्यासाठी रक्ताची गरज असते आणि याच कारणामुळे उन्हाळ्यात डास जास्त चावतात. यानंतर डासांची संख्याही वाढते. याच कारणाने सांयकाळ झाली तर डासांची संख्या वाढते.

घामामुळे...

घाम डास जास्त चावण्याचं दुसरं मोठं कारण आहे. उन्हाळ्यात व्यक्तीच्या शरीरातून जास्त घाम निघतो आणि या घामाच्या वासामुळे डास व्यक्तीकडे आकर्षित होतात. तुमच्या अंगावर घाम असेल किंवा तुम्ही घामाचे कपडे घातले असतील तर डास तुमच्याकडे जास्त येतात.

कपड्यांमुळे...

हिवाळ्यात आपणं आपलं शरीर जास्तीत जास्त झाकून ठेवण असतो. घराचे खिडकी-दरवाजे बंद ठेवत असतो. त्यामुळे हिवाळ्यात डास कमी चावतात. तेच उन्हाळ्यात आपण कमी किंवा पातळ कपडे घालतो. काही लोक तर झोपताना कपडेही घालत नाहीत. खिडक्या-दरवाजे उघडे असतात. अशात डास घरात येतात आणि हल्ला करतात.

वैज्ञानिकांचं मत...

न्यू जर्सीच्या प्रिंसटन यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी एडीज एजिप्टि प्रजातीच्या डासांवर एक रिसर्च केला आणि यात त्यांना आढळलं की, या प्रजातीचे अनेक डास मनुष्यांचं रक्त पिण्याऐवजी दुसऱ्या माध्यमातून आपलं पोट भरतात. त्याशिवाय एका दुसऱ्या रिसर्चमधून समजलं की, मनुष्यांचं रक्त नर डास नाही तर मादा डास पितात. 

Web Title: Why mosquitoes bite more in summer, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.