फिरायला गेलात किंवा बागेत डोक्यावर का घोंगावतात डास? जाणून घ्या यामागील मजेशीर कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 04:50 PM2022-01-07T16:50:02+5:302022-01-07T16:53:20+5:30

कित्येक वेळा संध्याकाळी आपण एखाद्या बागेत किंवा अगदी रस्त्यावरही उभे असलो, तर आपल्या डोक्यावर डास घोंघावत (Mosquito hover around our head) राहतात. केवळ डासच नाही, तर चिलटं किंवा अन्य छोटे-छोटे कीटकही अशाच प्रकारे आपल्या डोक्यावर घोंघावतात. कधी विचार केलाय, की यामागे काय कारण असेल?

why mosquitoes keep buzzing overhead know the interesting reason behind it | फिरायला गेलात किंवा बागेत डोक्यावर का घोंगावतात डास? जाणून घ्या यामागील मजेशीर कारण

फिरायला गेलात किंवा बागेत डोक्यावर का घोंगावतात डास? जाणून घ्या यामागील मजेशीर कारण

Next

संध्याकाळ झाली की डास येऊ नयेत म्हणून आपण घराच्या खिडक्या लावून घेतो. मात्र आपण बाहेर बसलो असलो, तर मात्र डासांपासून बचावाचा कोणताच पर्याय आपल्यासमोर नसतो. कित्येक वेळा संध्याकाळी आपण एखाद्या बागेत किंवा अगदी रस्त्यावरही उभे असलो, तर आपल्या डोक्यावर डास घोंघावत (Mosquito hover around our head) राहतात. केवळ डासच नाही, तर चिलटं किंवा अन्य छोटे-छोटे कीटकही अशाच प्रकारे आपल्या डोक्यावर घोंघावतात. कधी विचार केलाय, की यामागे काय कारण असेल?

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्य कीटकांच्या तुलनेत डासांचं असे आपल्या डोक्यावर घोंघावण्याचे (Mosquito fly around human head) प्रमाण सर्वाधिक असते. याला मुख्य कारण म्हणजे, आपल्या शरीरातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड (CO2) वायू. श्वासोच्छवास करताना आपण वातावरणातील ऑक्सिजन शरीरात ओढून घेतो, आणि कार्बन डायऑक्साईड (Mosquitos are attracted towards CO2) वातावरणात सोडत असतो. याच वायुमुळे तब्बल १० मीटर अंतरावरूनही डासांना जवळपास कोणीतरी माणूस असल्याचे समजते. या कार्बन डायऑक्साईडचा गंध डासांना आवडत असतो. झी न्यूजनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

तुम्हाला हे कदाचित माहिती नसेल, पण सगळेच डास आपल्याला चावत नाहीत. आपल्या शरीरातून रक्त शोषण्याचे काम केवळ मादी डास (Only female mosquitos bite) करत असतात. नर डास फळांमधून मिळणारा रस पितात. मात्र डोक्यावर घोंघावणाऱ्या डासांमध्ये नरांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळेच, तुम्ही पाहिलं असेल की डोक्यावर घोंघावणारे बहुतांश डास आपल्याला चावत नाहीत. पण मग हे नर डास (Interesting facts about mosquito) आपल्या डोक्यावर कशासाठी घोंघावत राहतात? याचेही उत्तर संशोधकांना मिळाले आहे. याचे कारण आहे, आपल्या डोक्यावरील घाम.

डासांना माणसांच्या घामाचा गंधही (Mosquito like the smell of our sweat) फार आवडतो. शरीरावरील इतर ठिकाणचा घाम लगेच जात असला, तरी डोक्यावर केस असल्यामुळे तेथील घाम लवकर वाळत नाही. याच घामाचा गंध घेण्यासाठी म्हणून डास आपल्या डोक्यावर घोंघावत राहतात. या व्यतिरिक्त, कित्येक लोकांनी केसांना लावलेल्या हेअर जेलचा गंधही (Mosquito get attracted towards smell of hair gel) डासांना आपल्याकडे आकर्षित करतो. हेदेखील कारण आहे की काही लोकांच्या डोक्याभोवती डास घोंघावत राहतात.

Web Title: why mosquitoes keep buzzing overhead know the interesting reason behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.