इंडोनेशियामधील दोन दिवसांच्या 'लग्ना'ची जगभरात चर्चा, परदेशी पर्यटक बनू शकतात पती!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 04:55 PM2024-10-04T16:55:06+5:302024-10-04T17:05:41+5:30
Pleasure marriages in Indonesia : सध्या इंडोनेशियामधील दोन दिवसांचं 'लग्न' सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतं. यावरून येथील ग्रामीण भागातील महिलांवर टीका केली जात आहे.
Pleasure marriages in Indonesia : जगभरात सध्या अनेक अजब अजब गोष्टी घडत आहेत. सध्या इंडोनेशियामधील दोन दिवसांचं 'लग्न' सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतं. यावरून येथील ग्रामीण भागातील महिलांवर टीका केली जात आहे. येथील गरीब महिला ५०० यूएस डॉलर्स म्हणजे साधारण ४१९०० रूपयांसाठी इथे येणाऱ्या पर्यटकांसोबत कथित शॉर्ट टर्म प्लेजर मॅरेज करत आहेत. या प्रकरणाची अधिक चर्चा होण्याचं आणखी एक कारण म्हणजे हा एक मुस्लिम देश आहे.
या देशातील काही गरीब तरूणींनी श्रीमंत पर्यटकांसोबत अनेकदा अशी काही दिवस टिकणारी लग्ने केली. जेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला तेव्हा याला 'कॅश फॉर सेक्स' स्कॅंडल असंही म्हटलं जाऊ लागलं. इंडोनेशियाच्या अनेक भागांमध्ये महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात त्यांनी पैशांसाठी हा मार्ग निवडला आहे. पर्यटकांच्या मजेसाठी त्या शॉर्ट टर्म प्लेजर मॅरेज करत आहेत.
कसं असतं हे 'लग्न'?
इंडोनेशियाच्या गावातील गरीब मुली मजा-मस्तीसाठी इंडोनेशियामध्ये येणाऱ्या पर्यटकांसोबत काही दिवसांसाठी लग्न करतात. इंडोनेशियाच्या पश्चिम प्रांताच्या पुनकक गावात सौदी अरबमधील पदार्थ भरपूर मिळतात. त्यामुळे इथे मिडल ईस्टमधील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.
एखाद्या रिसॉर्टमध्ये पुरूष पर्यटकांना एजन्सीच्या माध्यमातून स्थानिक महिलांना भेटवलं जातं. ज्या त्यांना टेम्पररी मॅरेज लावून देण्यास मदत करतात. दोन्हीकडील लोकांची सहमती झाल्यावर, लगेच एक छोटेखानी लग्न लावण्यात येतं. ज्यानंतर पुरूष त्या मुलीला पैसे देतात.
असं शॉर्ट टर्म लग्न करणाऱ्या महिला आपल्या परदेशी अस्थायी पतीसोबत शारीरिक संबंध ठेवतात आणि त्यांच्या घरातील कामेही करतात. जेव्हा पतीचा व्हिसा संपतो आणि त्यांची देश सोडण्याची वेळ येते तेव्हा हे लग्न आपोआप मोडतं.
दोन ते पाच दिवसात घटस्फोट
काहाया नावाच्या एका १८ वर्षीय तरूणी अशाप्रकारचं लग्न करण्याचा तिला अनुभव शेअर केला. लॉस एंजलिस टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, आतापर्यंत तिचं १५ वेळा लग्न झालं आहे. तिचे सगळे अस्थायी पती मिडल ईस्टमधील पर्यटक होते. तिचा पहिला पती ५० वर्षीय एक पर्यटक होता.
या तरूणीचं लग्न ८५० अमेरिकन डॉलरमध्ये ठरलं होतं. पर्यटकाने पेमेंटही पूर्ण दिलं होतं. एजंट आणि लग्न लावणारा व्यक्ती यांना कमिशन देऊन तिला ४२५ डॉलर उरले होते. लग्नाच्या पाच दिवसांनी तिचा पती त्याच्या देशात परतला. आज कहाया दररोज ३०० ते ५०० डॉलर कमावते. यातून ती तिच्या घराचं भाडं भरते आणि आजारी आजी-आजोबांची काळजी घेते.
निसा नावाच्या एका दुसऱ्या महिलेने सांगितलं की, तिचं अशाप्रकारे कमीत कमी २० वेळा लग्न झालं आहे. मात्र, ती आता हे काम करत नाही. निसाची भेट एका इंडोनेशिअम व्यक्तीसोबत झाली होती. तो पासपोर्ट ऑफिसमध्ये काम करत होता. त्यानेच तिला यात अडकवलं होतं. आता ती म्हणते की, पुन्हा ती हे काम करणार नाही.