नव्या टायरवर का असतात 'हे' रबरी काटे? काय म्हणतात त्यांना? क्वचितच कुणाला माहीत असेल उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 01:16 PM2024-11-09T13:16:02+5:302024-11-09T13:21:59+5:30

Nibs On Tire : सामान्यपणे टायरवरील हे रबरी काटे सगळेच बघतात. अनेकांना वाटतं की, यांची टायरच्या क्वालिटीमध्ये काही भूमिका असेल किंवा टायरच्या स्पीडमध्ये भूमिका असेल.

Why new tire have rubber spikes know the reason | नव्या टायरवर का असतात 'हे' रबरी काटे? काय म्हणतात त्यांना? क्वचितच कुणाला माहीत असेल उत्तर!

नव्या टायरवर का असतात 'हे' रबरी काटे? काय म्हणतात त्यांना? क्वचितच कुणाला माहीत असेल उत्तर!

Nibs On Tire : : बाईक असो वा कार गाडीच्या स्पीडमध्ये टायरची खूप महत्वाची भूमिका असते. टायर जर चांगल्या क्वालिटीचे असतील तर अपघाताचा धोकाही कमी होतो. बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे टायर मिळतात. पण यात दोन गोष्टी कॉमन असतात. एक म्हणजे टायरचा रंग काळाच असतो आणि दुसरी म्हणजे टायरवर रबरी काटे असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, टायरवर हे रबरी काटे कशासाठी असतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

सामान्यपणे टायरवरील हे रबरी काटे सगळेच बघतात. अनेकांना वाटतं की, यांची टायरच्या क्वालिटीमध्ये काही भूमिका असेल किंवा टायरच्या स्पीडमध्ये भूमिका असेल. काही लोकांना असंही वाटतं की, हे काटे टायर बनवताना चुकून तयार होत असतील. पण तसं नाहीये. चला जाणून घेऊ काय आहे टायरवर हे असण्यामागचं कारण..

मीडिया रिपोर्टनुसार, टायरवरील या रबरी काट्यांना स्पाइक्स म्हटलं जातं. कुणी 'निब' म्हणतात तर कुणी 'निपर्स' म्हणतात. मुळात जेव्हा टायर बनवले जातात तेव्हा हे स्पाइक्स आपोआप तयार होतात. ते वेगळे तयार करून लावले किंवा चिटकवले जात नाहीत. सगळ्यात आधी रबराचं पाणी साच्यात टाकलं जातं. रबर पूर्ण साच्यात परसवण्यासाठी हवेच्या दाबाचा वापर केला जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर उष्णता आणि दबाव एकाचवेळी असल्याने रबर आणि मोल्ड मधे हवेचे बुडबुडे तयार होतात.

टायर बनवताना हवेच्या या बुडबुड्यांमुळे टायरची क्वालिटी खराब होऊ शकते. त्यामुळेच हवेचे बुडबुडे दूर करण्यासाठी दबाव दिला जातो. जेव्हा हवेच्या दाबामुळे रबराच्या आतील हवेला छोट्या छिद्रांच्या माध्यमातून बाहेर काढलं जातं. यावेळी हवेसोबत थोडं रबरही बाहेर येतं. टायर थंड झाल्यावर हे बाहेर आलेलं रबरही थंड होतं.

टायर तयार झाल्यावर जेव्हा साच्यातून काढला जातो तेव्हा हे स्पाइक टायर चिकटलेले असतात. स्पाइक असण्याचा उद्देश टायर नवीन आहेत आणि त्यांचा वापर करण्यात आलेला नाही. टायरवर असलेल्या या रबरी काट्यांचा काहीही उपयोग नसतो. ते केवळ निर्माण प्रक्रियेचा भाग असतात. 

Web Title: Why new tire have rubber spikes know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.