जन्मताच अनाथ होतात जगातले सगळे ऑक्टोपस, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 10:50 AM2023-10-07T10:50:35+5:302023-10-07T10:51:41+5:30

Interesting Facts About Octopus : जगातील जवळपास प्रत्येक ऑक्टोपस हे जन्मताच अनाथ असतात. ते कधी त्यांच्या आईचा चेहरा बघू शकत नाहीत. याचं कारणही खास आहे.

Why octopus babies are always orphans know the reason | जन्मताच अनाथ होतात जगातले सगळे ऑक्टोपस, कारण वाचून व्हाल हैराण

जन्मताच अनाथ होतात जगातले सगळे ऑक्टोपस, कारण वाचून व्हाल हैराण

googlenewsNext

Interesting Facts About Octopus : जगातल्या सगळ्याच आईंना आपल्या बाळांची काळजी असते. आपलं बाळ सुरक्षित आणि निरोगी रहावं अशी त्यांची ईच्छा असते. त्यांना काही कमी पडू नये असं त्याना वाटत असतं. मनुष्य असो वा प्राणी त्या याच प्रयत्नात असतात. पण आज आम्ही तुम्हाला ऑक्टोपसच्या जीवनासंबंधी एक हैराण करणारी बाब सांगणार आहोत. जगातील जवळपास प्रत्येक ऑक्टोपस हे जन्मताच अनाथ असतात. ते कधी त्यांच्या आईचा चेहरा बघू शकत नाहीत. याचं कारणही खास आहे.

एक मादा ऑक्टोपस एकावेळी अनेक अंडी देते. त्यानंतर ती या अंड्यांची सुरक्षा करते. या प्रयत्नात मादा ऑक्टोपसचा जीव जातो. मादा ऑक्टोपस आपल्या पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी अंडी घेऊन एखाद्या गुहेत किंवा छिद्रात लपते. अंड्यातून पिल्लं बाहेर येण्यास अनेक महिन्यांचा वेळ लागतो. अशात मादा अंडी सोडून एका क्षणासाठीही बाहेर कुठे जात नाही. अंड्यांमधून पिल्लं बाहेर येणार इतक्यात मादा ऑक्टोपसचा भूकेने जीव जातो.

पाण्यात अंडी दिल्याने मादा ऑक्टोपसला आपल्या पिल्लांची चिंता असते. जास्तकरून ते एखाद्या गुहेत अंडी देतात किंवा एखाद्या दगडाखाली. या  प्रक्रियेत अनेक महिने किंवा एक वर्षही लागू शकतं. मादा यादरम्यान फक्त अंड्यांची रक्षा करते. ती शिकार करण्यासाठीही जात नाही. अशात ती उपाशीच असते.

अनेक महिने काहीच खाल्लं नाही तर मादा कमजोर होऊ लागते. आधी मादेचा रंग हलका होतो, नंतर शरीर कमजोर होऊ लागतं. अंड्यातून पिल्लं बाहेर येतात तोपर्यंत मादा ऑक्टोपसचा जीव जातो. पण असं सगळ्यात केसेसमध्ये होत नाही. काही मादा ऑक्टोपस अंडी सोडून शिकारीला जातात. त्यांचा जीवही वाचतो. पण अशा मादा परत आपल्या अंड्यांजवळ जात नाही. अशात ते एकप्रकारे अनाथच होतात.

Web Title: Why octopus babies are always orphans know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.