पॉपकॉर्न शिजवताना हवेत का उडतो? या मागे दडलेलं आहे रंजक विज्ञान, घ्या जाणून!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:23 PM2022-01-31T18:23:03+5:302022-01-31T18:27:11+5:30

आपण घरीच पॉपकॉर्न बनवू शकतो. पण पॉपकॉर्न बनवताना तो हवेत का उडतो, त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का की हे पॉपकॉर्न हवेत उडण्यामागे वैज्ञानिक कारण आहे.

why popcorn jump in the air while cooking know the scientific reason | पॉपकॉर्न शिजवताना हवेत का उडतो? या मागे दडलेलं आहे रंजक विज्ञान, घ्या जाणून!

पॉपकॉर्न शिजवताना हवेत का उडतो? या मागे दडलेलं आहे रंजक विज्ञान, घ्या जाणून!

googlenewsNext

सिनेमा (cinema) बघायचं म्हटलं की खायचा एक पदार्थ हमखास आठवतो, तो म्हणजे पॉपकॉर्न (popcorn). अनेकांना पॉपकॉर्न खायला खूप आवडतात. आजकाल तर पॉपकॉर्नचे कितीतरी फ्लेवर्स (Popcorn flavors) मिळतात. सिनेमा बघताना टाईमपास (time pass) करण्यासाठी खाल्ला जाणारा पॉपकॉर्न आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसंच वजन घटवण्यासाठी (weight loss) देखील उपयोगी ठरतो. पॉपकॉर्न बनवण्याचं काम देखील खूप सोपंय. आपण घरीच पॉपकॉर्न बनवू शकतो. पण पॉपकॉर्न बनवताना तो हवेत का उडतो, त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का की हे पॉपकॉर्न हवेत उडण्यामागे वैज्ञानिक कारण आहे.

बहुतेक सर्वांनीच पॉपकॉर्न बनत असताना पाहिलं असेल. मक्याचे दाणे भाजताना फुलल्याबरोबर ते हवेत उडू लागतात. हे दाणे उडू लागले की समजायचं पॉपकॉर्न खाण्यासाठी तयार आहेत. पण हे पॉपकॉर्न एवढे का उडतात, हा प्रश्न आहे. शास्त्रज्ञांनी याच प्रश्नावर संशोधन केलं असून संशोधनातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. खरं तर या गोष्टी आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत.

लाइव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार, पॉपकॉर्न हवेत उडण्याची अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे पॉपकॉर्न जास्त तापमानात भाजले जातात. तुम्हाला माहितीए का, की १७० डिग्री सेल्सिअस तापमानात भाजल्यानंतरही फक्त ३० टक्के कॉर्न पॉपकॉर्नमध्ये रुपांतरित होतात. तर, ९० टक्के पॉपकॉर्न भाजण्यासाठी १८० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते.

पॉपकॉर्न उडण्यामागच्या अनेक कारणांपैकी दुसरं कारण म्हणजे मक्यामध्ये पाण्याचं प्रमाण १० ते २० टक्के आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पॉपकॉर्न भाजण्यावरही होतो. जेव्हा मक्याचे दाणे गरम केले जातात, तेव्हा त्यात दाब तयार होतो आणि त्यातल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते फुटू लागतात, परिणामी ते उडतात.

पॉपकॉर्न भाजताना एक विशिष्ट प्रकारचा आवाज देखील तुम्ही ऐकला असेल. त्यामागेही एक महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे त्यामध्ये असलेलं पाणी. जेव्हा आपण पॉपकॉर्न भाजतो तेव्हा त्यात पाणी असल्यामुळे, वाफ सोडण्यासाठी दाब निर्माण होतो आणि मग तो फुटतो, तो फुटल्यामुळे त्यातून आवाज येतो. त्या आवाजावरून तो पॉपकॉर्न भाजला गेलाय आणि खाण्यास तयार असल्याचं कळतं. पॉपकॉर्न (popcorn) भाजत असताना जसजसा त्यांच्यात दाब निर्माण होतो तसतसं ते वेगाने फुगतात. एका मर्यादेनंतर ते फुटून त्याचा पॉपकॉर्न तयार होतो. या मक्याच्या दाण्यात असलेल्या स्टार्च मॉलिक्यूलचा फ्लेक्स बनतो, म्हणून त्या स्टार्चमुळे पॉपकॉर्न भाजताना तो हवेत उडतो, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.

पॉपकॉर्न तुम्ही बऱ्याचदा खाल्ले असतील, पण ते तयार होताना हवेत का उडतात, याचा नक्कीच कधी विचार केला नसेल. तर, वर सांगितलेल्या कारणांमुळे मक्याचे दाणे भाजताना ते हवेत उडतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग त्याचा पॉपकॉर्न तयार होतो.

Web Title: why popcorn jump in the air while cooking know the scientific reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.