अखेर सायंकाळनंतर का केलं जात नाही मृतदेहाचं पोस्टमार्टम? वाचा काय आहे कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 02:53 PM2021-05-15T14:53:07+5:302021-05-15T14:53:51+5:30
मृतदेहांचं पोस्टमार्टम सायंकाळनंतर केलं जात नाही. पण असं का? का सायंकाळनंतर मृतदेहांचं पोस्ममार्टम केलं जात नाही? चला आजू याचं उत्तर आणि कारण जाणून घेऊ.
आपल्या आजूबाजूला नेहमीच अशा घटना घडत असतात, ज्यांबाबत आपण नेहमीच ऐकत-बघत असतो. काहीवेळा आपल्याला या घटनांबाबत अनेकदा माहिती मिळते, तर अनेकदा त्यांची माहिती रहस्य बनून राहते. आज आम्ही तुम्हाला एका अशाच विषयाबाबत माहिती देणार आहोत. हे सर्वांनाच माहीत आहे की, मृत्यूनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जातं. अपघातात मृत्यू झाला असेल किंवा हत्या झाली असेल. त्यांचं पोस्टमार्टम केलं जातं. पण मृतदेहांचं पोस्टमार्टम सायंकाळनंतर केलं जात नाही. पण असं का? का सायंकाळनंतर मृतदेहांचं पोस्टमार्टम केलं जात नाही? चला आजू याचं उत्तर आणि कारण जाणून घेऊ.
काय आहे याचं कारण
इथे हे समजून घेणं फार गरजेचं आहे की, पोस्टमार्टम एकप्रकारचं ऑपरेशनच आहे. याद्वारे मृतदेहांचं परीक्षण केलं जातं. पोस्टमार्टम करून हे जाणून घेतलं जातं की, व्यक्तीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला. मीडिया रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत असेल तर मृत्यूनंतर सहा ते १० तासांच्या आत पोस्टमार्टम करणं अनिवार्य आहे. कारण उशीर झाला तर मृतदेहांमध्ये नैसर्गिक बदल होऊ लागतात. असंही सांगितलं जातं की, सायंकाळनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जात नाही कारण लाइटच्या प्रकाशात व्यवस्थितपणे परीक्षण केलं जात नाही.
हे आहे महत्वाचं कारण
ट्यूबलाइट, एलईडी किंवा बल्बमध्ये जखमेचा रंग लाल ऐवजी जांभळा दिसू लागतो. तर फॉरेन्सिक सायन्समध्ये या रंगाच्या जखमेचा काहीच उल्लेख नाही. असं मानलं जातं की, जर जखमेचा रंग लाल ऐवजी आणखी कोणता दिसत असेल तर त्या रिपोर्टला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे कधीही सायंकाळनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जात नाही. कारण त्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. असं काही होऊ नये किंवा रिपोर्टमध्ये काहीहीच चूक राहू नये म्हणून हे केलं जातं.