अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनाला व्हाइट हाऊस का म्हणतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 01:53 PM2020-02-26T13:53:47+5:302020-02-26T14:33:27+5:30

जेव्हा या वास्तुची निर्मिती करण्यात आली त्यावेळी याचं नाव 'प्रेसीडेंट्स पॅलेस' किंवा 'प्रेसीडेंट मँशन'  असे होते.

Why president house called white house in america know the reason | अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनाला व्हाइट हाऊस का म्हणतात?

अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनाला व्हाइट हाऊस का म्हणतात?

googlenewsNext

जगातील जवळपास सगळ्याच राष्ट्रपतींना राहण्यासाठी सरकारी सदनीका असते. भारतात या सदनिकेला राष्ट्रपती भवन असं म्हणतात.  अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनाला व्हाईट हाऊस असं म्हणतात. सुरूवातीपासूनच या वास्तुचे नाव व्हाईट हाऊस नव्हते.  जेव्हा या वास्तुची निर्मिती करण्यात आली त्यावेळी याचं नाव 'प्रेसीडेंट्स पॅलेस' किंवा 'प्रेसीडेंट मँशन'  असे होते. मग या वास्तुचं नावं व्हाईट हाऊस का ठेवण्यात आलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.  यामागे नावामागे ११८ वर्षांचा इतिहास आहे. 

'व्हाइट हाउस'  फक्त अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान नाही तर अमेरिकेच्या इतिहासातील  उत्कृष्ट ऐतिहासिक वास्तुंमध्ये याचा समावेश होतो.व्हाइट हाउसमध्ये  प्रत्येक शक्तीशाली देशात असाव्या अशा अनेक सुविधा आहेत. यात एक भुयारी मार्ग सुद्धा  आहे.  जो मार्ग राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबासाठी संकटाच्यावेळी वापरण्यासाठी आहे. 

आयरलँडमध्ये जन्म झालेल्या  जेम्स होबन यांनी व्हाईट हाऊसचे डिजाईन केले होते. या वास्तुच्या निर्मीतीचे कार्य  १७९२ ते १८०० या कालावधीत म्हणजेच आठ वर्षात पूर्ण झाले. वाचून तुमचा विश्वास बसणार नाही पण आज ज्या ठिकाणी व्हाईट हाऊस आहे. त्याठिकाणी एकेकाळी जंगलं आणि पर्वतांचे साम्राज्य होते.

व्हाइट हाऊसमध्ये  एकूण १३२ खोल्या आहेत. त्यात ३५ बाथरूम आणि ४१२ दरवाजे आहेत. ८  शिड्या १४७ खिडक्या आणि ३ लिफ्ट आहेत. सहा मजल्यांच्या या इमारतीत दोन बेसमेंट आणि दोन  मजले अमेरिकेच्या राष्ट्रपतींसाठी सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त व्हाईट हाऊसमध्ये पाच फुलटाईम शेफ काम करतात. या ठिकाणी १४० लोकांना एकत्र बसण्याची व्यवस्था केली जाते. 

व्हाइट हाउसच्या बाहेरची भिंत रंगवण्यासाठी  ५७० गॅलन रंगाची गरज लागते. असं सांगितलं जातं की  १९९४ मध्ये व्हाईट हाऊस  रंगवण्याचा खर्च २ लाख ८३ हजार डॉलर म्हणजेच १ कोटी ७२ लाखांपर्यत आला होता. अमेरिकी राष्ट्रपती भवनाचे नाव व्हाईट हाऊसमागे एक घटना आहे. १८१४ मध्ये ब्रिटिश आर्मीने वॉश्गिंटन डीसीमध्ये ठिकठिकाणी आग लावली होती. त्यावेळी या आगीत व्हाईट हाऊसचा सुद्धा समावेश होता. ( हे पण वाचा- गोव्याच्या गर्दीला कंटाळले असाल तर आता सुंदर गोकर्णच्या बीचवर नक्की फिरून या!)

या कारणामुळे या वास्तुची सुंदरता कमी झाली. त्यानंतर या इमारतीला आकर्षक बनवण्यासाठी  पांढरा रंग देण्यात आला. मग या वास्तुला व्हाईट हाऊस म्हटलं जाऊ लागलं. नंतर १९०१ मध्ये अमेरिकेने २६ वे राष्ट्रपती थियोडोर रूजवेल्ट यांना अधिकृतरित्या याचं नाव व्हाईट हाऊस ठेवलं. (हे पण वाचा-सापाच्या विळख्यात अडकलेला सोन्याचा खजिना पाहून डोळे उघडेच राहतील!)

Web Title: Why president house called white house in america know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.