रोलेक्सचं घड्याळ इतकं महाग का असतं? जाणून घ्या यामागचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 06:10 PM2023-03-02T18:10:34+5:302023-03-02T18:11:20+5:30
Rolex Watch Price : मुळात रोलेक्स घड्याळाची बांधणी ही सर्वोत्तम कारागिरीचा नमूना मानली जाते. कारण ही घड्याळ इतर घड्याळांप्रमाणे तयार केली जात नाही.
Rolex Watch Price : घड्याळ वापरणं आज स्टेटस समजलं जातं. आधी लोक पॉकेज वॉचचा वापर करायचे. हे सुद्धा फार स्टेटसचं मानलं जात होतं. नंतर घड्याळं सहज मिळू लागली. आज 100 रूपयांपासून कोट्यावधी रूपयांची घड्याळं मिळतात. पण काही कंपन्यांची खूपच चर्चा होते. त्यातीलच एक म्हणजे रोलेक्स. रोलेक्सचं घड्याळ फार महाग मिळतं. चला जाणून घेऊ यामागचं कारण...
सर्वात महागड्या घड्याळीचा विषय निघाला की, जास्तीत जास्त लोकांच्या डोळ्यांसमोर एकच नाव आधी येतं. ते म्हणजे रोलेक्स. रोलेक्स प्रत्यक्षात अनेकांनी बघितलेली नसते. पण घड्याळांची आवड असणाऱ्यांना रोलेक्सची किंमत नक्कीच माहीत असते. तर अनेकांना असाही प्रश्न पडत असेल की, अखेर या रोलेक्सच्या घड्याळी इतक्या महाग का असतात?
मुळात रोलेक्स घड्याळाची बांधणी ही सर्वोत्तम कारागिरीचा नमूना मानली जाते. कारण ही घड्याळ इतर घड्याळांप्रमाणे तयार केली जात नाही. या घड्याळाचं काम इतक्या बारकाईने केलं जातं की, याची किंमत लाखोंच्या घरात जाते. तसेच ही घड्याळं तयार करण्यासाठी स्पेशलल रिसर्च अॅन्ड डेव्हलप लॅब असतात.
रोलेक्स घड्याळ तयार करण्यासाठी काही निवडक स्पेशालिस्ट्सकच निवडले जातात. यांचाच पगार कोट्यवधींच्या घरात असतो. तसेच या घड्याळाची आणखी एक खासियत म्हणजे या घड्याळांसाठी ९४० एल स्टील वापरलं जातं, जे फारच मजबूत असतं. सामान्य घड्याळांमध्ये ३४० किंवा त्यापेक्षा कमी एल स्टील वापरलं जातं. तसेच रोलेक्सचे पार्ट्स हे हाय टेक मशीनींद्वारे तयार करण्यात येतात.
हे घड्याळ महाग असण्याचं आणखी एक कारण म्हणजे या घड्याळींच्या डायलमध्ये व्हाइट गोल्डचा वापर केला जातो. तसेच यात ज्या नंबर्सचा वापर केला जातो ते सुद्धा स्पेशल प्लॅटिनमपासून तयार केलेले असतात.
कंपनीनुसार, रोलेक्सच्या घड्याळात पार्ट्स इतक्या बारकाईने लावण्यात येतात की, मोजणारे हैराण होतील. हे फारच काळजीपूर्वक लावावे लागतात. कारण ते लावताना खराब होण्याचाही धोका असतो. रोलेक्समध्ये ज्या मटेरिअलचा वापर होतो ते फार महागडं असतं. हे घड्याळ तयार करताना सोन्याचाही वापर केला जातो.