चपलेला हवाई चप्पल का म्हटलं जातं? जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 11:29 AM2019-12-16T11:29:54+5:302019-12-16T11:40:50+5:30

चप्पल श्रीमंतातल्या श्रीमंत आणि गरीबातल्या गरीब माणसाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. पण चप्पल वापरण्याची सुरूवात, ती तयार कशी करण्यात आली याचा इतिहास आज जाणून घेऊ.

Why sleepers are known as 'Hawai Chappal'? | चपलेला हवाई चप्पल का म्हटलं जातं? जाणून घ्या कारण....

चपलेला हवाई चप्पल का म्हटलं जातं? जाणून घ्या कारण....

Next

स्लिपर चप्पल ही हवाई चप्पल म्हणूनही ओळखली जाते. ही चप्पल श्रीमंतातल्या श्रीमंत आणि गरीबातल्या गरीब माणसाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. पण चप्पल वापरण्याची सुरूवात, ती तयार कशी करण्यात आली याचा इतिहास आज जाणून घेऊ.

हवाई चप्पल का म्हटलं जातं?

(Image Credit : planetware.com)

इंग्रजीत स्लिपर आणि हिंदी-मराठीत चप्पल म्हटलं जातं. चप्पलची स्ट्रीप म्हणजे बेल्ट हा V किंवा Y आकाराचा असतो. पण चप्पलला हवाई चप्पल का म्हटलं जातं? तर काही इतिहासकारांनुसार, हवाई चप्पल ही अमेरिकेतील हवाई आयलॅंडमुळे मिळाली. अमेरिकेत हवाई नावाचं एक आयलॅंड आहे. या आयलॅंडवर 'टी' नावाचं झाड आहे. या झाडापासून जे रबराचं फॅब्रिक तयार होत त्यापासून चप्पल तयार केली जाते. त्यामुळेच चपलेला हवाई चप्पल म्हणतात. काही लोका असंही म्हणतात की, चप्पल हवेसारखी हलकी असते म्हणून हवाई म्हटलं जातं.

प्रत्येक देशात वेगळे डिझाइन

चपलेचा इतिहास फार जुना आहे. चीन, भारत, इजिप्त, जपान, अमेरिकासहीत वेगवेगळ्या देशांमध्ये चपलेचं डिझाइन आणि त्यासंबंधित अनेक किस्से प्रचलित आहेत. वेगवेगळ्या देशात चपलेला वेगवेगळं नाव आहे. जपानमध्ये चपलेचा इतिहास १८८० मध्ये आढळतो.

यादरम्यान शेतात काम करण्यासाठी अनेक मजूर जपानमध्ये हवाई आयलॅंडवरून आले होते. तेच मजूर त्यांच्यासोबत चप्पल घेऊन आले होते. त्यानंतर जपानमध्ये चपलेचं नवं डिझाइन तयार करण्यात आलं. जपानमध्ये तयार चपलांचा वापर दुसऱ्या महायुद्धावेळी केला होता. त्यानंतर हवाई चप्पल जगभरात प्रसिद्ध झाली.

चप्पल कुणी केली लोकप्रिय?

(Image Credit : top10buddy.com)

दुसऱ्या महायुद्धानंतर चप्पल जगभरात लोकप्रिय झाली. पण त्यासोबतच चप्पल लोकप्रिय करण्याचं श्रेय ब्राझीलियन कंपनी हवाइनाजला जातं. १९६२ मध्ये हवाइनाज कंपनीने पांढऱ्या आणि निळ्या रंगाची निळ्या रंगाची स्ट्रीप असलेली चप्पल लॉन्च केली होती. हीच चप्पल आज घराघरात बघायला मिळते. हवाइनाजमुळेच भारत आणि जगभरात काही ठिकाणांवर चपलेला हवाई चप्पल म्हटलं जातं.


Web Title: Why sleepers are known as 'Hawai Chappal'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.