कांदा कापताना डोळ्यातून पाणी येण्याचं काय आहे कारण? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 10:51 AM2023-05-31T10:51:25+5:302023-05-31T10:51:25+5:30

Tears While Cutting Onion : कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं आणि जळजळही होऊ लागते. पण याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर चला जाणून घेऊ याचं कारण...

Why tears come while cutting onions know the reason | कांदा कापताना डोळ्यातून पाणी येण्याचं काय आहे कारण? जाणून घ्या...

कांदा कापताना डोळ्यातून पाणी येण्याचं काय आहे कारण? जाणून घ्या...

googlenewsNext

Tears While Cutting Onion : भाजी बनवणं असो वा सलाद करणं असो कांदा त्यात हवाच असतो. कांदा खाण्याने पदार्थाना केवळ चव मिळते असं नाही तर आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं आणि जळजळही होऊ लागते. पण याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर चला जाणून घेऊ याचं कारण...

एक्सपर्ट्सनुसार, कांदा कापताना डोळ्यातून येणाऱ्या पाण्यामागे एक रसायन आहे. कांद्यामध्ये सिन-प्रोपेनेथियल-एस-ऑक्साइड नावाचं रसायन असतं. याच रसायनामुळे डोळ्यातून पाणी येतं. होतं असं की, कांदा कापतानाच त्यातील लेक्रायमेट्री-फॅक्टर सिंथेस एंजाइम बाहेर निघतं. जे डोळ्यातील लेक्राइमल ग्लॅंडला प्रभावित करू लागतं आणि मग डोळ्यात पाणी येऊ लागतं.

एका मीडिया रिपोर्टनुसार रिसर्चच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, सिन-प्रोपेनेथियल-एस-ऑक्साइड डोळ्याच्या लॅक्रिमल ग्रंथींना प्रभावित करतं, ज्यामुळे डोळ्यातून पाणी येतं. जेव्हा आपण कांदा कापतो तेव्हा लेक्रायमेट्री-फॅक्टर सिंथेस एंजाइम हवेत मिक्स होतं. यानंतर हे एंजाइम सल्फेनिक अॅसिडमध्ये रूपांतरित होतं. ज्यामुळे डोळ्यात जळजळ होऊ लागते आणि पाणी येऊ लागतं. 

भलेही कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत असेल, पण कांदा शरीरासाठी फायदेशीर असतो. कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, सी, सोडिअम, पोटॅशिअम, लोह आणि फायबरसारखे पोषक तत्व भरपूर असतात. कांद्यामध्ये फोलिक अॅसिडही असतं.

Web Title: Why tears come while cutting onions know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.