टेलीफोनचा वायर सरळ का नसतो? जाणून घ्या कॉईल वायर असण्याचं कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 03:28 PM2023-09-16T15:28:46+5:302023-09-16T15:29:20+5:30
टेलीफोनचे वायर नेहमी कर्ल का केले जातात? यामागे एक मोठं कारण आहे. ज्याबाबत तुम्हाला कदाचित माहीत नसेल.
टेलीफोनवर बोलताना तुम्ही अनेकदा त्यावरील गुंडाळेला वायर आपल्या बोटांनी फिरवला असेलच. टेलीफोनच्या तारांचा कामही तेच आहे, जे इतर वायरचं असतं. विजेचा सप्लाय करणं, पण मग इतर वायरप्रमाणे त्यांना सरळ का ठेवलं जात नाही? टेलीफोनचे वायर नेहमी कर्ल का केले जातात? यामागे एक मोठं कारण आहे. ज्याबाबत तुम्हाला कदाचित माहीत नसेल.
अनेक वर्षाआधीपासून लोक कॉइल वायरचा वापर करत आहेत. हे वायर सामान्य जास्त टेलीफोनमध्ये बघायला मिळतात. कॉइल वायर केवळ टेलीफोनसाठीच नाहीयेत. ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्येही कामी येतात. इतर वायरच्या तुलनेत कॉइल्ड वायरचं डिझाइन जास्त सुरक्षित असतं.
यात सुरक्षेसाठी प्लास्टिक इन्सुलेशनमध्ये कोटिंग करण्याच्या प्रक्रियेचा समावेश आहे. मग त्या तारांना एका विशेष प्लास्टिकमध्ये छाकलं जातं जे स्प्रिंग किंवा कॉइलमध्ये बनवले जातात. त्यांची टेस्ट घेतली जाते. वायर तुम्ही किती ताणू शकता. याने आतील तारांवर काहीच परिणाम होत नाही.
फोनसाठी का वापरला जातो कॉइल वायर
अनेकदा टेलीफोन्सवर बोलताना लोक रिसिव्हरला फोनपासून दूर खेचतात. कॉइल वायर जास्त फ्लेक्सिबल असतात. त्यामुळे ते सहजपणे दूर खेचले जाऊ शकतात. त्याशिवाय जेव्हा रिसिव्हर पुन्हा फोनवर ठेवला जातो तेव्हा वायर पुन्हा आपल्या आधीच्या शेपमध्ये येतो.
याद्वारे जागेचा वापरही कमी होतो. जर कॉइल वायरऐवजी साधे वायर वापरले असते तर फोनच्या आजूबाजूला ते पसरलेले राहिले असते. मग ते जमा करण्याचं काम वाढलं असतं. अशात कॉइल वायर आपोआप आपल्या जागेवर जातात. सरळ वायरमध्ये तुटण्याचा आणि गाठ पडण्याचा धोकाही असतो. कॉइल वायरचा वापर इंटरनेट सिग्नल, डेटा ट्रांसफरसाठीही केला जातो.