मॉल्स किंवा थिएटरमध्ये टॉयलेटच्या दरवाज्यांमध्ये गॅप का असतो? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 12:18 PM2024-01-27T12:18:39+5:302024-01-27T12:21:02+5:30
तुम्हाला कधीना कधी हा प्रश्न पडला असेल की, या टॉयलेट्सचे दरवाजे खालून उघडे का असतात किंवा त्यात गॅप का असतो? चला जाणून घेऊ याचं कारण..
शहरात ऑफिसांमध्ये किंवा मॉलमध्ये कधीना कधी पब्लिक टॉयलेट वापरले असतीलच. काही ठिकाणी टॉयलेट इतके चकाचक स्वच्छ असतात की, अवाक् व्हायला होतं. पण या टॉयलेटमधील एका गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं नसेल. ती म्हणजे टॉयलेटचे दरवाजे. तुम्हाला कधीना कधी हा प्रश्न पडला असेल की, या टॉयलेट्सचे दरवाजे खालून उघडे का असतात किंवा त्यात गॅप का असतो? चला जाणून घेऊ याचं कारण..
यामागचं कारण...
यामागे अनेक कारणं आहेत. सर्वात पहिलं कारण तर हे आहे की, याने स्वच्छता करताना सोपं काम होतं. पब्लिक टॉयलेटचा वापर अनेक लोक करतात. त्यामुळे लवकर बेकार होतात. अशात खालून उघड्या दरवाज्यांमुळे फ्लोर पुसण्यास सोपं होतं. पण यामागे हे एकच कारण नाहीये. आणखीही काही कारणांनी टॉयलेटचे दरवाजे छोटे ठेवले जातात.
अनुचित प्रकार रोखण्यासाठी
अनेकदा काही लोक पब्लिक टॉयलेट्सचा वापर सेक्शुअल अॅक्टिविटीसाठीही करतात. लोकांनी असे प्रकार करू नये म्हणूनही टॉयलेटचे दरवाजे खालून छोटे ठेवले जातात. तसेच वरूनही टॉयलेट यासाठीच उघडे ठेवले जातात.
लहान मुलं आणि आजारी लोकांची सिक्युरीटी
टॉयलेटचे दरवाजे लहान असण्याचं आणखी एक कारण म्हणजे जर लहान मुलगा आत गेला किंवा एखादा आजारी व्यक्ती आता गेला आणि त्याने आतून लॉक लावलं तर त्याला बाहेर काढण्यासाठी सोपं काम होतं. तसेच कुणी बाथरूममध्ये बेशुद्ध पडलं तर या छोट्या दरवाजामुळे त्यांना बाहेर काढणं सोपं होतं.
दारू-सिगारेट पिऊ नये म्हणून
अनेकदा काही लोक पब्लिक टॉयलेट्समध्ये दारू-सिगारेट ओढतात. दरवाजा लहान असल्याने आत बसलेल्या लोकांच्या अशा कारनाम्यावरही लक्ष ठेवता येतं.