बाइक किंवा गाडीच्या टायरवर का असतात काटेदार रबर हेअर? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 02:38 PM2022-09-26T14:38:53+5:302022-09-26T14:39:17+5:30
Interesting Fact About Tire: तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, टायरवर रबराचे काळे काटेदार केस असतात. जास्तीत जास्त लोकांना याबाबत माहिती नसते.
Interesting Fact About Tire: बाइक आणि कार स्पीडमध्ये चालवण्याची अनेकांना आवड असते. पण हे करत असताना यात टायरची मोठी महत्वाची भूमिका असते. जर गाडीचा टायर चांगल्या क्वालिटीचा असेल तर अपघात होण्याची शक्यता कमी असते. बाइक किंवा कार चालवणारे लोक नेहमीच गाडी चालवण्याआधी गाडीचे टायर चेक करतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, टायरवर रबराचे काळे काटेदार केस असतात.
जास्तीत जास्त लोकांना याबाबत माहिती नसते. त्यांना वाटतं की, मॅन्युफॅक्टरींग डिफेक्टमुळे हे असतील. पण त्यांना हे सांगतो की, हे काही डिफेक्टमुळे होत नाही. हे ठरवून दिलेले असतात. या Rubber Hair वरून टायरची क्वालिची समजून येते. चला जाणून घेऊ यामागचं काय आहे कारण...
टायरवर असलेल्या या काटेदार रबर हेअरला Vent Spews असं म्हणतात. जे टायरच्या वर बाहेर निघालेले असतात. हे Vent Spews टायरची गुणवत्ता दाखवतात. ज्या टायरवर रबर हेअर असतात ते चांगल्या क्वालिटीची मानले जातात.
दरम्यान, हे असण्याचं मोठं कारण हेही आहे की, जेव्हा गाडी रस्त्यावर चालते तेव्हा यावेळी टायरवर दबाव पडतो. हाच दबाव कमी करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग दरम्या रबर हेअर लावले जातात. त्याशिवाय हे असण्याचं
दुसरं कारण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग दरम्यान टायरमध्ये रबर इंजेक्ट केले जातात. त्यासोबतच रबर इंजेक्ट करण्यासाठी हीट आणि हवा दोन्हींचाही वापर करण्यादरम्यान टायरमध्ये बुडबुडे तयार होण्याची भीती असते. अशात Vent Spews हा धोका कमी करण्याचं काम करतात.
काही लोक टायर चांगले दिसावे म्हणून ते काढून टाकतात. पण असं करणं योग्य नाही. याने तुमच्या गाडीच्या टायरची क्वालिटी डॅमेज होते. जर काही महिने टायरमध्ये हे रबर हेअर राहिले तर नव्या टायरची लाइफ वाढते. जर तरीही तुम्हाला हे दूर करायचे असतील तर ते हाताने खेचून काढा. ते काढण्यासाठी रेजर किंवा धारदार वस्तूचा वापर करू नका.