Love Story : ४ वर्षाने लहान असलेल्या भावाच्या प्रेमात पडली विधवा बहीण, कुटुंबियांनी बोलवली पंचायत आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:10 PM2022-03-24T17:10:22+5:302022-03-24T17:11:28+5:30
Widow Sister Fell in Love With Brother : प्रेयसी ही प्रियकरापेक्षा ४ वर्षाने मोठी आहे. महिलेच्या पतीचं निधन गेल्यावर्षी नदीत बुडून झालं होतं.
बिहारमधून (Bihar) एक अजब प्रेम कहाणी (Love Story) समोर आली आहे. पश्चिम चंपारण जिल्ह्यातील विधना बहीण तिच्या लहान भावाच्या प्रेमात (Widow Sister Fell in Love With Brother) पडली. दोघे असे काही प्रेमात पडले त्यांनी वेगळे राहण्यास नकार दिला. दोघांना एकत्रच जगायचं आणि मरायचं होतं. पण कुटुंबियांनी आणि समाजाने त्यांचं हे प्रेम नाकारलं. कुटुंबियांनी दोघांना शिक्षा देण्यासाठी पंचायत बोलवली. ज्यानंतर प्रेमी युगुलाने पोलीस स्टेशनकडे सुरक्षेची मागणी केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोघांना स्थानिकांपासून सोडवण्यात आलं. पोलीस म्हणाले की, लग्न करणं हा व्यक्तिगत भाग आहे आणि त्यात चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप करणं योग्य नाही. कुणी कायदा हाती घेतला तर कारवाई केली जाईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाऊ-बहिणीच्या प्रेमाची ही घटना बेतियाच्या बानुछापार भागातील आहे. महिलेच्या पतीचं साधारण १ वर्षाआधी निधन झालं होतं. त्यानंतर ती ४ वर्षाने लहान मावस भावाच्या प्रेमात पडली. दोघांनी सोबत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. पण कुटुंबियांनी हे नातं नाकारलं. त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकले नाहीत. अशात त्यांनी पंचायत बोलवली. इथे त्यांचं टक्कल करून गावातून धिंड काढण्याचं ठरलं. मात्र, प्रेमी युगुलाने वेळीच पोलिसांना याची सूचना दिली.
'दैनिक जागरण'च्या वृत्तानुसार, पोलीस येताच या प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून प्रेमी युगुलाची सुटका केली. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिकांना समजावलं की, सर्वांना कायद्यानुसार लग्न करण्याचा अधिकार आहे. सोबतच इशारा दिला की, कुणी त्यांना त्रास दिला तर कायदेशीर कारवाई केली जाईल.
प्रियकर सुनील कुमार म्हणाला की, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांना लग्न करायचं आहे. सुनीलने सांगितलं की, त्यांचे कुटुंबिय या नात्याने आनंदी नाही आणि ते लग्नाला विरोध करत आहेत. ते प्रेयसीने सांगितलं की, ते दोघेही लग्न करतील. प्रेयसी ही प्रियकरापेक्षा ४ वर्षाने मोठी आहे. महिलेच्या पतीचं निधन गेल्यावर्षी नदीत बुडून झालं होतं.