रात्री पतीसोबत झोपली होती पत्नी, झोपेत असं काही बोलली थेट तुरूंगात झाली रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 03:37 PM2023-12-01T15:37:05+5:302023-12-01T15:42:53+5:30

दोघांमध्ये भांडण होत नव्हतं. पण अचानक एका रात्री असं काही झालं ज्यामुळे पतीने आपल्या पत्नीला पोलिसांच्या हवाली केलं.

Wife admitted crime in her sleep husband calls police at midnight and sent her to jail | रात्री पतीसोबत झोपली होती पत्नी, झोपेत असं काही बोलली थेट तुरूंगात झाली रवानगी

रात्री पतीसोबत झोपली होती पत्नी, झोपेत असं काही बोलली थेट तुरूंगात झाली रवानगी

पती आणि पत्नीमधील नातं हे प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं. जेव्हा दोघे एकमेकांपासून काहीच लपवत नाहीत तेव्हा त्यांचं नातं जास्त काळ टिकतं. पण जेव्हा या नात्यात काही लपवणं सुरू होतं तेव्हा येते खरी समस्या. सोशल मीडियावर एका कपलची अशीच कहाणी शेअर करण्यात आली आहे. या कपलच्या जीवनात तसं तर सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. दोघांमध्ये भांडण होत नव्हतं. पण अचानक एका रात्री असं काही झालं ज्यामुळे पतीने आपल्या पत्नीला पोलिसांच्या हवाली केलं.

61 वर्षीय एंटोनीने 47 वर्षीय रूथ फोर्टसोबत 2010 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर दोघांचं नातं सुरळीत सुरू होतं. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. त्यांचं वैवाहिक जीवन चांगलं सुरू होतं. पण एका रात्री अचानक असं काही झालं की, एंटोनीने आपल्या पत्नीला पोलिसांच्या हवाली केलं. ना दोघांमध्ये काही भांडण झालं ना काही वाद. पण झोपेत रूथने असा काही खुलासा केला की, एंटोनीने पोलिसांना बोलवलं.

झोपेत कबूल केला गुन्हा

एंटोनी एका रात्री पत्नीसोबत झोपला होता. तेव्हा रूथने झोपेत मान्य केलं की, तिने एका दिव्यांग महिलेचं एटीएम चोरी केलं आणि त्यातूनच ती पैसे खर्च करत आहे. हे ऐकताच एंटोनीने पोलिसांना बोलवलं आणि पत्नीला तुरूंगात पाठवलं. 

एंटोनीनुसार, ज्या महिलेवर तो प्रेम करतो तिने दुसऱ्यांना असं फसवणं बरोबर नाही. स्वत: एंटोनीने आपल्या पत्नी विरोधात केस दाखल केली आहे. नंतर कोर्टात रूथचा गुन्हा सिद्ध झाला आणि तिला 16 महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा झाली.
 

Web Title: Wife admitted crime in her sleep husband calls police at midnight and sent her to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.