करवा चौथला गर्लफ्रेंडसोबत मार्केटमध्ये शॉपिंग करत होता पती, पत्नीने पाहिलं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 10:01 AM2022-10-14T10:01:13+5:302022-10-14T10:01:22+5:30
Ghaziabad Viral Video: गाझियाबादमध्ये करवा चौथच्या दिवशी गर्लफ्रेंडला मार्केटमध्ये शॉपिंगसाठी नेणं एका पतीला चांगलंच महागात पडलं. मार्केटमध्ये आपल्या आईसोबत खरेदी करण्यासाठी आलेल्या पत्नीने पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिलं.
Karva Chauth 2022 Ghaziabad Viral Video: करवा चौथला पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी उपवास ठेवते. पण गाझियाबादमध्ये करवा चौथच्या दिवशी गर्लफ्रेंडला मार्केटमध्ये शॉपिंगसाठी नेणं एका पतीला चांगलंच महागात पडलं. मार्केटमध्ये आपल्या आईसोबत खरेदी करण्यासाठी आलेल्या पत्नीने पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिलं. त्यानंतर तिची आई आणि बहिणींनी मिळून पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडला चांगलाच चोप दिला. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पतीला अटक केली आणि त्याच्या गर्लफ्रेंडला इशारा देऊन सोडून दिलं.
5 वर्षाआधी झालं होतं कपलचं लग्न
पोलिसांनुसार, गाझियाबादच्या सिहानी चुंगी भागातील कौशल नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेचं 4 मार्च 2017 ला प्रताप विहार सेक्टर-12 मधील एका तरूणासोबत लग्न झालं होतं. काही महिन्यांनी कपलमध्ये वाद झाला. ज्यानंतर पत्नी आपल्या माहेरी निघून गेली आणि तिथे आपल्या परिवारासोबत राहू लागली. पत्नीनुसार, ती तिच्या मुलांसोबत 3 वर्षापासून आपल्या माहेरी राहत आह. तिने कौटुंबिक हिंसाचाराची पतीवर केस केली आहे.
गाजियाबाद तुराब नगर मार्केट में करवा चौथ पर प्रेमिका को शॉपिंग कराने आया था पति पीछे से पहुंची पत्नी ने बरसाई चप्पल!#Ghaziabad@Uppolice@JavedMustafa_@Live_Gyanpic.twitter.com/WAauq6IKVy
— SURAJ KUMAR (@surajkumarmahak) October 13, 2022
पत्नीने पोलिसांना सांगितलं की, गुरूवारी सायंकाळी ती तिच्या आईसोबत तुराबनगर मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी गेली होती. यादरम्यान तिने तिच्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहिलं. दोघेही करवा चौथची शॉपिंग करत होते. त्यांना बघताच पत्नी संतापली. तिने पतीला पकडलं. तिच्या आईने आणि बहिणींनी पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडला चांगलाच चोप दिला.
सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलिसांनी सांगितलं की, चौकशीनंतर आरोपी तरूणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या गर्लफ्रेंडला इशारा देऊन सोडण्यात आलं. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.