पत्नीने पतीला मसाज पार्लरमध्ये रंगेहाथ पकडलं, दुसऱ्या महिलेला केली जबर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 04:03 PM2023-01-30T16:03:29+5:302023-01-30T16:03:54+5:30

ही घटना थायलॅंडच्या फुकेतमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील एका ठिकाणी पती आणि पत्नी दोघे सोबत राहत होते. पण पतीचं मसाज करणाऱ्या एका तरूणीसोबत अफेअर सुरू होतं.

Wife caught husband in massage parlour with worker and fight starts in Thailand | पत्नीने पतीला मसाज पार्लरमध्ये रंगेहाथ पकडलं, दुसऱ्या महिलेला केली जबर मारहाण

पत्नीने पतीला मसाज पार्लरमध्ये रंगेहाथ पकडलं, दुसऱ्या महिलेला केली जबर मारहाण

Next

पती आणि पत्नीमधील वादाच्या तसेच भांडणाच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली असून इथे एका पत्नीने तिच्या पतीला रंगेहाथ पकडलं आणि दुसऱ्या महिलेली चांगलीच धुलाई केली. इतकंच नाही तर दोघींमध्ये चांगलीच फाइट झाली आणि त्यांचं  भांडण सोडवण्यासाठी पोलिसांना मधे यावं लागलं. हे सगळं तेव्हा झालं जेवह पती लपून एका दुसऱ्या महिलेला भेटण्यासाठी मसाज पार्लरमध्ये पोहोचला होता. 

ही घटना थायलॅंडच्या फुकेतमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील एका ठिकाणी पती आणि पत्नी दोघे सोबत राहत होते. पण पतीचं मसाज करणाऱ्या एका तरूणीसोबत अफेअर सुरू होतं. एक दिवस पती काहीतरी कारण सांगत बाहेर फिरायला गेला तेव्हा पत्नीला संशय आला. पत्नीने त्याचा पाठलाग केला तर तिला दिसलं की, तो एका मसाज पार्लरमध्य गेला.

पत्नी सुद्धा पतीसोबत मसाज पार्लरमध्ये गेली. मसाज पार्लरमध्ये पती गेल्यावर 10 मिनिटात त्याची पत्नीही तिथे पोहोचली आणि तिने पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं. यावेळी तिला दिसलं की, एक महिला कपडे न घालत केवळ एक टॉवेल गुंडाळून बसली आहे आणि तिचा पती तिच्याजवळ आहे. हे बघून पत्नी रागाने लाल झाली. पत्नीला बघताच पती तिथून फरार झाला.

तेच पती फरार होताच पत्नीने दुसऱ्या महिलेवर हल्ला केला.  पत्नीने त्या महिलेचा टॉवेल खेचला आणि तिच्या मारहाण सुरू केली. जवळपास पाच मिनिटे पत्नीने त्या महिलेला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. काही वेळाने तिथे पोलीस पोहचले. ते घटनेची चौकशी करत आहेत.

Web Title: Wife caught husband in massage parlour with worker and fight starts in Thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.