हेच राहिलं होतं! कोरोना पॉझिटिव्ह पतीला किडनी देण्यास पत्नीचा नकार, म्हणाली - आधी संपत्ती नावे करा....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 03:07 PM2021-05-14T15:07:52+5:302021-05-14T15:15:25+5:30
हे भांडण इतकं वाढलं की, लोक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत होते. याप्रकरणी कुणीही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही.
राजस्थानच्या भरतपूर जिल्हा आरबीएम हॉस्पिटलमधील कोविड-१९ वार्डात रूग्णाच्या नातेवाईकांमध्ये जोरदार भांडण झाल्याची घटना समोर आली आहे. हे भांडण इतकं वाढलं की, लोक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत होते. याप्रकरणी कुणीही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो तीन दिवसाआधीचा असल्याचं सांगितलं जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, धानोता गावातील रूपकिशोरची किडनी खराब आहे आणि अशात त्याला कोरोनाचीही लागण झाली होती. त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयाच्या कोविड वार्डात दाखल केलं गेलं होतं. नातेवाईक रूग्णाच्या पत्नीला सांगत होते की, तून त्याला किडनी दे. जेणेकरून त्याचा जीव वाचेल. मात्र, पत्नीने किडनी देण्यास नकार दिला. पत्नी म्हणाली की, ती किडनी तेव्हाच देईल जेव्हा रूपकिशोर सर्व संपत्ती तिच्या नावावर करेल. (हे पण वाचा : वाह रे वाह! पठ्ठयाने चक्क शरीरसंबंधासाठी केली ई-पासची मागणी, पोलिसांनी उचलून आणलं तर दिलं हे स्पष्टीकरण...)
यावरूनच गेल्या काही दिवसांपासून पत्नी आणि नातेवाईकांमध्ये भांडण सुरू होतं. गेल्या सोमवारी पत्नीच्या माहेरचे लोक कोविड-१९ वार्डात आले आणि रूपकिशोरच्या नातेवाईकांसोबत त्यांनी भांडण सुरू केलं. यादरम्यान दोन्हीकडील लोकांनी एकमेकांना चांगलीच मारामारी केली. दोन्हीकडील लोकांनी तिथे असलेल्या टेबल फॅनने एकमेकांना मारलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (हे पण वाचा : चितेवर अचानक उठून बसला मृतदेह, अंत्यसंस्काराआधी स्मशानभूमीत एकच गोंधळ...)
जिल्हा रूग्णालयाचे पीएमओ डॉ. जिज्ञासा साहनीने सांगितले की, वार्डात रूग्णाचे नातेवाईक घुसले होते आणि दोन्हीकडील लोकांमध्ये जोरदार मारमारी झाली. ज्यात स्टाफलाही मारहाण झाली. ते म्हणाले की यात वार्डाबाहेर तैनात सुरक्षा रक्षकांची चूक आहे ज्यांनी लोकांना आत येऊ दिलं.