खूब लड़ी मर्दानी! पाय जबड्यात धरून मगरीने नदीत खेचत नेलं; पत्नीने पतीला मृत्यूच्या दारातून परत आणलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 11:09 AM2023-04-12T11:09:48+5:302023-04-12T11:15:53+5:30

Wife Save Husband Life : एका शेतकरी त्याच्या बकऱ्यांना पाणी पिण्यासाठी चंबल नदी किनारी घेऊन आला होता. तो बकऱ्यांना पाणी पाजत होती इतक्या मगरीने त्याचा पाय धरला आणि त्याला खेचत नदीत नेलं.

Wife fight with Crocodile to save her husband in chambal river karauli Rajasthan | खूब लड़ी मर्दानी! पाय जबड्यात धरून मगरीने नदीत खेचत नेलं; पत्नीने पतीला मृत्यूच्या दारातून परत आणलं

खूब लड़ी मर्दानी! पाय जबड्यात धरून मगरीने नदीत खेचत नेलं; पत्नीने पतीला मृत्यूच्या दारातून परत आणलं

googlenewsNext

Wife Save Husband Life :  राजस्थानच्या करौली जिल्ह्यातून एक फारच कौतुकास्पद अशी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी चक्क मगरीसोबत दोन हात केले आणि त्याची मगरीच्या तावडीतून सुटका केली. महिला एकटीच पतीला वाचवण्यासाठी काठी घेऊन मगरीसोबत लढली.

एक शेतकरी त्याच्या बकऱ्यांना पाणी पिण्यासाठी चंबल नदी किनारी घेऊन आला होता. तो बकऱ्यांना पाणी पाजत होता इतक्या मगरीने त्याचा पाय धरला आणि त्याला खेचत नदीत नेलं. त्याची आरडा-ओरड ऐकून त्याची पत्नी धावत आली. आधी तर तिला काही सुचलं नाही. पण नंतर तिने मगरीचा सामना केला. 

ही घटना करौली जिल्ह्याच्या मंडरायलच्या रोधईच्या कॅमकच्छ गावातील आहे. मगर शेतकऱ्याला खेचत नदीत नेत होती. आधी पत्नी घाबरली, पण त्यानंतर तिने हिंमत दाखवत काठी घेऊन नदीत उडी घेतली. महिलेने काठीने मगरीवर जोरदार हल्ला सुरू केला. ती लागोपाठ हल्ला करत राहिली. इतकंच नाही तर महिलेने मगरीच्या डोळ्यात काठी टाकली. यानंतर मगरीने तिच्या पतीचा पाय सोडला आणि ती निघून गेली.

मगर आणि महिलेमधील हा संघर्ष साधारण 5 मिनिटे सुरू होता. शेवटी महिला आपल्या पतीला वाचवण्यात यशस्वी ठरली. जखमी शेतकऱ्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. महिला म्हणाली की, पतीला वाचवताना तिचा जीवही गेला असता तरी चाललं असतं. ती म्हणाली की, पतीला मगरीच्या तावडीतून सोडवून त्याने दुसरा जन्म घेतला आहे. सध्या सगळीकडून या महिलेचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

Web Title: Wife fight with Crocodile to save her husband in chambal river karauli Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.