आता बोला! पतीने कुरकुरे दिले नाही म्हणून पत्नी नाराज, माहेरी गेली अन् पोलिसात तक्रारही केली!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 01:36 PM2024-05-13T13:36:12+5:302024-05-13T13:38:40+5:30

ही घटना वाचल्यावर तुम्ही नक्कीच पोटधरून हसाल. इथे पत्नी 5 रूपयांचं कुरकुऱ्याचं पाकीट मिळालं नाही म्हणून नाराज झाली. 

Wife fight with husband for kurkure filled police complaint against husband | आता बोला! पतीने कुरकुरे दिले नाही म्हणून पत्नी नाराज, माहेरी गेली अन् पोलिसात तक्रारही केली!

आता बोला! पतीने कुरकुरे दिले नाही म्हणून पत्नी नाराज, माहेरी गेली अन् पोलिसात तक्रारही केली!

पती-पत्नीमधी रूसवे-फुगव्यांच्या, भांडणाच्या अजब अजब कारणांच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. काही घटना तर अशा असतात त्या बघून हसावं की रडावं हेच कळत नाही. अशीच एक घटना यूपीच्या आग्र्यामधून समोर आली आहे. ही घटना वाचल्यावर तुम्ही नक्कीच पोटधरून हसाल. इथे पत्नी 5 रूपयांचं कुरकुऱ्याचं पाकीट मिळालं नाही म्हणून नाराज झाली. 

पतीने कुरकुरे घेऊन दिले नाही म्हणून पत्नी रूसली आणि माहेरी निघून गेली. पतीने यावर सांगितलं की, त्याची पत्नी रोज त्याला कुरकुरे घेऊन मागते. रोज-रोज कुरकुरे आणून मी हैराण झालोय. तर दुसरीकडे कुरकुरे मिळाले नाही म्हणून नाराज झालेल्या पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी सध्या हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे सोपवलं आहे. इथे दोघांची काउन्सेलिंग करण्यात आली. दोघांनाही आता पुढील तारीख देण्यात आली. सोबतच वाद मिटवून आनंदाने राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

मीहितीनुसार, येथील तरूणाचा विवाह शेजारच्या गावातील तरूणीसोबत 2023 मध्ये हिंदू रितीरिजावानुसार झाला होता. लग्नानंतर दोघेही आनंदाने संसार करत होते. पण पत्नीच्या कुरकुरे खाण्याच्या अजब सवयीमुळे दोघांमध्ये वाद पेटला.

आरोप आहे की, पत्नी रोज पतीकडे ऑफिसमधून घरी येताना कुरकुरेचं पॅकेट आणण्याची मागणी करते. पती नेहमी कुरकुरे घेऊनही जातो. पण एक दिवस पती कुरकुऱ्याचं पॅकेट घेऊन जाणं विसरला तर पत्नी नाराज झाली. दोघांमध्ये यावरून कडाक्याचं भांडण झालं. पत्नी इतकी नाराज झाली की, आपल्या माहेरी निघून गेली. गेल्या दीड महिन्यांपासून ती पतीला सोडून माहेरी राहत आहे.

नुकतीच पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे सोपवलं आहे. केंद्रातील काउन्सेलर डॉ. सतीश खिरवार यांनी सांगितलं की, काउन्सेलिंग दरम्यान पतीने सांगितलं की, पत्नीने 5 रूपयांच्या कुरकुरेवरून भांडण केलं. कुरकुरे दिले नाही म्हणून ती रागावून माहेर निघून गेली. तेच पत्नी म्हणाली की, पतीने मारहाण केली होती. त्यामुळे ती माहेरी गेली. काउन्सेलरने हेही सांगितलं की, महिलेला कुरकुरे खाण्याची फार जास्त सवय आहे. सध्या दोघांना पुढील तारीख देण्यात आली आहे.

Web Title: Wife fight with husband for kurkure filled police complaint against husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.