बायकोनं दिली गुडन्यूज; आनंदी होण्याऐवजी नवऱ्याचा उडाला फ्यूज, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 11:49 AM2021-09-06T11:49:20+5:302021-09-06T11:51:52+5:30
एका व्यक्तीने सोशल मीडिया साइट रेडिटवर आपली समस्या सांगत लोकांना सल्ला मागितला आहे. तो म्हणाला की, पत्नी प्रेग्नेंट होणं त्याच्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही.
सामान्यपणे पत्नीने पतीला ती प्रेग्नेंट असल्याची बातमी दिली तर पती आनंदाने उड्या मारतात. पण एका महिलेने जेव्हा आपल्या पतीला ती प्रेग्नेंट असल्याची बातमी दिली तर पतीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याला कसं रिअॅक्ट करावं हेच कळत नव्हतं. एका व्यक्तीने सोशल मीडिया साइट रेडिटवर आपली समस्या सांगत लोकांना सल्ला मागितला आहे. तो म्हणाला की, पत्नी प्रेग्नेंट होणं त्याच्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही.
पतीने व्यक्त केली चिंता
‘डेली स्टार’ च्या एका रिपोर्टनुसार, एका अमेरिकन महिलेने आपल्या पतीला सांगितलं की, ती तिसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. हे ऐकताच पतीच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण दोन वर्षापूर्वीच त्याने नसबंदी केली होती. त्यामुळे पतीला हे समजत नाहीये की, त्याची पत्नी प्रेग्नेंट कशी झाली? त्याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये चिंता व्यक्ती केली की, बाळ त्याचं आहे की नाही? (हे पण वाचा : पत्नी प्रेग्नेंट झाल्याची पतीने केली तक्रार, अधिकाऱ्यांनी केलेली विचित्र मागणी ऐकून झाला हैराण)
आपल्या पोस्टमध्ये पतीने लिहिलं की, 'मी दोन वर्षापूर्वी नसबंदी केली होती. आता याची किती शक्यता आहे की, बाळ माझं आहे किंवा माझ्या पत्नीचं कुठे अफेअर सुरू आहे. इतकी वर्ष पतीसोबत राहिल्यावर मला नाही वाटत की, ती मला दगा देईल. मला हे समजत नाहीये की, नसबंदी केल्यावरही एखादी व्यक्ती पिता होऊ शकते का?'.
डॉक्टरांनी दिला सल्ला
व्यक्ती लोकांकडे मदत मागत म्हणाला की, 'मला इंटरनेटवर संमिश्र उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सल्ला मागत आहे'. या चिंतीत पतीला अनेकांनी सल्ले दिले. जास्तीत जास्त लोक म्हणाले की, पत्नीवर आरोप लावण्यापूर्वी त्याने आपल्या स्पर्म काउंटची टेस्ट करावी. तेच एका डॉक्टरने कमेंट करत सांगितलं की, त्याच्या एका रूग्णासोबत असंच झालं होतं. त्याचा स्पर्म काउंट झीरो होता. पण नसबंदी केल्यावर त्याची ट्यूब वेगळ्या प्रकारे जुळली गेली होती. ज्यामुळे त्याचा स्पर्म काउंट अचानक वाढला होता.