पती जंकफूड खाऊ देत नाही म्हणून पत्नी गेली कोर्टात, वाचा पुढे काय झालं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 04:19 PM2024-08-24T16:19:44+5:302024-08-24T16:20:29+5:30
पतीने पत्नीचं जंकफूड खाणं बंद केलं म्हणून पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्याला कोर्टात खेचलं.
Husband wife Junk food dispute : आजकाल जास्तीत जास्त लोक जंकफूड किंवा फास्टफूड खातात. पण तुम्ही कधी ऐकलं नसेल की, कुणाचं जंकफूड खाणं बंद केलं म्हणून कुणाला तुरूंगात जावं लागलं असेल. अशीच एक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीचं जंकफूड खाणं बंद केलं म्हणून पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्याला कोर्टात खेचलं. या शुल्लक कारणावरून पतीला पोलीस उचलून घेऊन गेले, ज्यामुळे त्याचा मनस्तापही वाढला.
कर्नाटक हायकोर्टात पती-पत्नीशी संबंधित अजब केसेस समोर येत आहेत. इथे एक पती पत्नीला सतत जंकफूड खाण्यापासून रोखत होता. अशात पत्नी थेट पोलिसात तक्रार केली आणि पोलीस पतीला उचलून घेऊन गेले. या केसमध्ये हायकोर्टाने नुकताच पतीला जामीन दिला आहे. त्याशिवाय कोर्टाने पतीविरोधातील चौकशीही थांबवली आहे.
केसची सुनावणी करताना कर्नाटक हायकोर्टाचे जस्टिस एम नागप्रसन्ना म्हणाले की, व्यक्तीविरोधातील तक्रार फारच सामान्य होती. तक्रारीत पत्नीचा आरोप होता की, मुलाच्या जन्मापासून पती पत्नीला फ्रेंच फ्राइज खाऊ देत नव्हता.
याप्रकरणी व्यक्तीला दिलासा देत कोर्टाने त्याला त्याच्या कामानिमित्त परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, काही दिवसांआधीही कर्नाटक हायकोर्टमध्ये पती-पत्नी यांच्यातील एक अजब केस आली होती. या केसमध्ये पत्नीने पतीकडे दर महिन्याला 6 लाक 16 हजार रूपये देण्याची मागणी केली होती.
या केसची सुनावणी करणाऱ्या जज महिलेच्या वकिलावर भडकल्या होत्या. त्या म्हणाल्या की, योग्य तो हिशोब आणा....नाही तर ब्रांडचा शौक असेल तर स्वत:च कमवा...या केसमध्ये महिलेने गुडघ्याच्या फिजिओथेरपीसाठी 5 लाख रूपये, शूज-कपड्यांसाठी 15000 रूपये, घर खर्चासाठी महिन्याला 6 हजार रूपये आणि फिरण्यासाठी वेगळे पैसे मागितले होते.