बीवी नंबर 1! दुधात पाणी टाकतो म्हणून पत्नीची पतीविरोधात तक्रार, सासर सोडून गेली माहेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:36 PM2024-05-22T12:36:53+5:302024-05-22T12:38:02+5:30
हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचलं असून दोघेही घटस्फोटाच्या वाटेवर आहेत. सध्या दोघांचं काउन्सेलिंग केलं जात आहे.
कौटुंबिक समुपदेशन केंद्रातून नेहमीच वेगवेगळ्या अजब घटना किंवा वादाच्या घटना समोर येत असतात. सध्या आग्र्यातील कौटुंबिक समुपदेशन केंद्रातून एक अजब घटना समोर आली आहे. ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. इथे एका पत्नीने तक्रार केली की, तिचा पती दुधामध्ये पाणी टाकतो. या कारणावरून पती आणि पत्नीमध्ये भांडण झालं. इतकंच काय तर पत्नीने पतीचं घर सोडलं आणि आता ती आपल्या माहेरी राहते. हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचलं असून दोघेही घटस्फोटाच्या वाटेवर आहेत. सध्या दोघांचं काउन्सेलिंग केलं जात आहे.
येथील काउन्सेलर डॉ. अमित गौड यांनी सांगितलं की, राजाखेडा येथे राहणाऱ्या तरूणाचं लग्न राजपूर चुंगी येथे राहणाऱ्या तरूणीसोबत दोन वर्षाआधी झालं होतं. पत्नी धार्मिक स्वभावाची आहे. पती दूध विकण्याचं काम करतो. तो जेव्हा जेव्हा शहरात दूध विकायला जातो तेव्हा त्यात पाणी टाकतो. पत्नीला जेव्हा हे दिसलं तेव्हा तिला याचा राग आला. पत्नी दुधात भेसळ केल्याची कमाई अजिबात नको होती. यावरून जेव्हा तिने पतीला टोकलं तर दोघांमध्ये भांडण झालं. काही महिन्यांआधी पत्नी सासर सोडून माहेरी गेली.
काउन्सेलिंग दरम्यान पतीने याबाबत सांगितलं की, जर दुधात पाणी टाकलं नाही तर त्याला घाटा होणार. घाट्याची भरपाई करण्यासाठी तो दुधात पाणी टाकून विकतो. डॉक्टर गौड म्हणाले की, दोघांचीही समजूत काढली जात आहे. पत्नी म्हणाली की, जर पतीने दुधात पाणी टाकणं बंद केलं तरच ती सासरी परत येईल. आता काउन्सेलरने दोघांना पुन्हा एकदा काउन्सेलिंगसाठी बोलवलं आहे.
कुरकुऱ्यावरून भांडण
काही दिवसांआधी आग्र्याच्या कौटुंबिक समुपदेशन केंद्रातून पती-पत्नीच्या वादाचं एक अजब कारण समोर आलं होतं. पतीने कुरकुरे घेऊन दिले नाही म्हणून पत्नी रूसली आणि माहेरी निघून गेली. पतीने यावर सांगितलं की, त्याची पत्नी रोज त्याला कुरकुरे घेऊन मागते. रोज-रोज कुरकुरे आणून मी हैराण झालोय. तर दुसरीकडे कुरकुरे मिळाले नाही म्हणून नाराज झालेल्या पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
आरोप आहे की, पत्नी रोज पतीकडे ऑफिसमधून घरी येताना कुरकुरेचं पॅकेट आणण्याची मागणी करते. पती नेहमी कुरकुरे घेऊनही जातो. पण एक दिवस पती कुरकुऱ्याचं पॅकेट घेऊन जाणं विसरला तर पत्नी नाराज झाली. दोघांमध्ये यावरून कडाक्याचं भांडण झालं. पत्नी इतकी नाराज झाली की, आपल्या माहेरी निघून गेली. गेल्या दीड महिन्यांपासून ती पतीला सोडून माहेरी राहत आहे.